Income Tax Filing Mistake: देशातील कोट्यवधी नोकरदार करदात्यांना 31 जुलै 2026 पर्यंत आयकर विवरणपत्र दाखल करण्याची संधी आहे. आतापर्यंत एक कोटींहून जास्त आयटीआर दाखल केले गेले आहेत, पण आयटीआर दाखल केल्यानंतर तुमच्या लक्षात आले की तुमच्याकडून चूक झाली आहे किंवा अपूर्ण किंवा चुकीची माहिती दिली गेली आहे किंवा माहिती राहून गेली तर, तुम्ही ITR हटवून नवीन दाखल करू शकता.
होय, करदात्यांच्या सोयीसाठी आयकर विभागाने Discard Income Tax Return सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा ITR खालीलप्रमाणे हटवू शकता.
आयटीआर डिलीट करायचा पर्याय
लक्षात घ्या की आयकर विभागाने करदात्यांना दाखल केलेला आयटीआर डिलीट करण्याचा पर्याय दिला आहे पण, एका अटीवर. तुम्ही तुमचा आयटीआर सत्यापित किंवा व्हेरिफाय केला नसेल तरच Discard Income Tax Return हा पर्याय वापरू शकता पण, तुम्ही तुमचा आयटीआर पडताळला असेल तर डिलीट किंवा हटवू शकत नाही. याशिवाय ITR हटवल्यानंतर तुम्ही Undue करू शकत नाही आणि तुम्हाला नवीन आयटीआर दाखल करावा लागेल.
आयटीआर डिस्कार्ड करण्याचा फायदा
‘Discard IT return’ काय आहे? या नवीन पर्यायामुळे करदात्याला काही चूक आढळल्यास सुधारित विवरणपत्र भरण्याऐवजी आपले मूळ आयकर विवरणपत्र ‘रद्द’ करण्याची मुभा मिळते. फाईल केलेला आयटीआर डिस्कार्ड करण्याचा पर्याय बऱ्याच करदात्यांच्या फायद्याचे ठरले असून यामुळे आयटीआर दाखल करण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सोपी झाली आहे.
चुका दुरुस्त करण्याची सुलभता
एखाद्या व्यक्तीने आयटीआर दाखल करताना चूक केली आणि अद्याप आयटीआरची पडताळणी केली नसेल, तर संपूर्ण आयटीआर रद्द करून पुन्हा नव्याने दाखल करू शकतात. जोपर्यंत आयटीआरची ई-पडताळणी होत नाही, तोपर्यंत करदाते गरज पडल्यास कितीही पर्याय आयटीआर डिस्कार्ड करण्याचा पर्याय वापरू शकतात.
सुधारित ITR दाखल करण्याची कटकट संपली
याआधी छोट्याशा चूकीसाठीही संपूर्ण सुधारित विवरणपत्र दाखल करावे लागायचा. पण, आता करदाते ई-व्हेरिफाय न केलेले आयटीआर सहज हटवून नवीन दाखल करू शकतात. यामुळे वेळेची बचत होते आणि प्रक्रिया सोपी होते.
लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.
मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.
पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.
2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.
शैक्षणिक पात्रता
प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.… आणखी वाचा