Headlines

DCM Ajit Pawar Says I Love You too to Supporter During Wardha Visit Viral Video; गर्दीतून ‘दादा, I LOVE U’ आवाज, अजित दादा म्हणाले ‘I LOVE U TOO’, पण कोणाला? VIDEO


Ajit Pawar I Love U Video : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्याला आय लव यू टू!’, असं प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या या बोलण्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान, अजितदादांनी यावेळी आपल्या काही कार्यकर्त्यांना झापलं.

Ajit Pawar love you comment
अजित पवार व्हायरल व्हिडिओ(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या वर्धा दौऱ्यादरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या निवासस्थानी जेवणासाठी गेले असता, तेथून निघताना एका उत्साही कार्यकर्त्याने जोरात म्हटलं ‘दादा, आय लव यू!’ या अनपेक्षित प्रेमाचं अजितदादांनीही तितक्याच प्रेमळ पद्धतीने उत्तर दिलं ते लगेच म्हणाले ‘आय लव यू टू!’.

अजितदादांचं हे प्रत्युत्तर ऐकताच उपस्थितांमध्ये हास्याची आणि आनंदाची लाट उसळली. क्षणभरासाठी राजकीय कार्यक्रमाचं औपचारिक वातावरण अगदी हलकंफुलकं झालं. हा गमतीशीर आणि हृद्य प्रसंग सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरासमोर घडला. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि उपस्थित नागरिकांमध्ये अजित पवार यांच्याविषयीचं प्रेम व आपुलकी या क्षणातून अधोरेखित झाली.

Maharashtra Timesरोहित पवार यांना जामीन मंजूर, विशेष PMLA कोर्टाचा मोठा निर्णय

मला पाया पडलेलं आवडत नाही

अजित पवार सकाळी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अजितदादा पोहोचल्यानंतर ते त्यांच्या कारमधून उतरतात. त्यावेळी दादांच्या स्वागतासाठी कारसमोर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी हातात हार, पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. दादा कारमधून उतरल्यानंतर जमलेले कार्यकर्ते त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना अरे, पाया पडू नका. मला पाया पडलेलं आवडत नाही, असं म्हटलं.

त्याचवेळी तिथे वर्ध्यात अनेक कार्यकर्त्यांप्रमाणे एका कार्यकर्त्याने दादांसाठी हार आणला होता. एका पदाधिकाऱ्याने त्या कार्यकर्त्याकडे दादांना घालण्यासाठी हार मागितला. त्यावेळी कार्यकर्त्याने प्लास्टिकच्या पिशवीतून हार बाहेर काढला आणि ती प्लास्टिकची पिशवी खालीच रस्त्यात टाकून दिली.

Maharashtra Timesदररोजच्या अपमानाला वैतागलोय, आता मी…; पत्र लिहून SBI क्लर्क बेपत्ता, परिसरात एकच खळबळ

कार्यकर्त्याची हीच कृती अजित पवारांनी पाहिली आणि एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्या प्लास्टिक पिशवी खाली टाकणाऱ्या कार्यकर्त्याला झापलं. कचरा करायचा? काय रे तुम्ही, वेड्याचा बाजार, घे ती प्लास्टिकची पिशवी इथे… असं बोलून स्वत: अजित दादा ती पडलेली पिशवी उचलण्याखाली खाली वाकतात. पण तेवढ्यात आणखी एक जण खाली वाकून ती पडलेली पिशवी उचलतो. या दौऱ्यावेळी अजित दादांची ही कृती पुन्हा एकदा त्यांच्या रोखठोकपणाचा आणि शिस्तप्रियतेचा दाखलाच देऊन गेली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा