Headlines

DA Hike July 2026 for Central Govt Employees; 8th Pay Commission लागू होण्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट; 3 टक्के वाढणार DA, हातात किती येणार पगार?


DA Hike July 2026: केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढ करते. जानेवारी 2026 मध्ये यंदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 टक्के डीए वाढ दिली गली होती, तर आता जुलैपासून यामध्ये पुन्हा बदल होणार आहे. जून 2026 च्या AICPI आकडेवारी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीच्या आधारावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

DA Hike for Central Govt Employees from July 2026
8th Pay Commission लागू होण्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 3 टक्के वाढणार, हातात किती येणार पगार?(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Central Govt Employees DA Hike : 1 कोटींहून अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्स 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण या दरम्यान, जुलैपासून महागाई भत्त्यात -DA – आणि महागाई सवलत म्हणजे DR वाढीची भेटही मिळणार आहे. केंद्र सरकार वर्षातून दोनदा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करते. जानेवारी 2026 मध्ये 2 टक्के डीए वाढीनंतर आता जुलैपासून लागू होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारचे कर्मचारी उत्सुकता आहेत.

कामगार ब्युरोने अलीकडेच मासिक AICPI – औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक – आकडेवारी प्रसिद्ध केली, जी 150.8 होती. हा निर्देशांक केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA कॅल्क्युलेट करताना वापरला जाणारा महत्त्वाचा घटक मानला जातो.
Maharashtra TimesAI Data Centers: AI चा गेम ओव्हर? 79 टक्के डेटा सेंटर्ससमोर ब्लॅकआऊटचं संकट; दिग्गज टेक कंपन्यांना धडकी भरली

जुलैपासून DA मध्ये किती वाढ होणार?

याआधी जानेवारीपासून केंद्र सरकारच्या DA आणि DR मध्ये अनुक्रमे 2 टक्के वाढ केली गेलेली. यानंतर डीए कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 60 टक्केपर्यंत वाढले. जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होऊ शकते? पाहूया.

कामगार मंत्रालयाने मे महिन्याचा AICPI निर्देशांक 150.8 इतका जाहीर केला आहे, जो गेल्या एक वर्षातील सर्वोच्च आहे. ही आकडेवारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मोजण्याचा मुख्य आधार असते, पण अंतिम निर्णय कामगार ब्युरो जुलै महिन्याच्या अखेरीस जून महिन्याचा AICPI च्या आकडेवरीनंतर घेतला जाईल. तेव्हाच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात किती वाढ होईल, याबाबत चित्र स्पष्ट होईल.
Maharashtra TimesStock Crash: शब्दाच महत्त्व बघा… चर्चित IT स्टॉक खरेदी करायला कोणी नाही तयार; गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली, लागले लोअर सर्किट

DA वाढीची अपेक्षा काय

मे महिन्यातील आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून 3% डीए वाढ दिली जाऊ शकते पण, जून महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्यावर 4% पर्यंत वाढ पोहोचण्याचा अंदाज असून यासह केंद्र सरकारचा एकूण महागाई भत्ता 63 ते 64 टक्क्यांवर पोहोचेल. अशाप्रकारे, एखाद्या कर्मचाऱ्याचा किमान मूळ पगार 40000 रुपये असेल, तर 50% महागाई भत्ता मिळाल्यानंतर एकूण पगार = 40000 रुपये + (40000 रुपयांच्या 50%) = 40000 + 20000 = 60000 रुपये होईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किंवा सवलत एका सूत्रानुसार कॅल्क्युलेट केला जातो. सध्याच्या AICPI-IW आकडेवारीनुसार, महागाई भत्त्याचा दर 63.13% असून महागाई भत्त्यातील वाढ निश्चित करण्यासाठी सरकार एक पूर्णांक संख्या वापरते, जे 63% असेल. म्हणजे जून 2026 पासून महागाई भत्त्यात 3% वाढ होईल.
Maharashtra TimesDonald Trump: एका वर्षात 132 हजार कोटींची कमाई… डोनाल्ड ट्रम्प यांनी इतका पैसा कुठून आणला? US राष्ट्राध्यक्षांच्या क्रिप्टो खेळीने वादंग
जून महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्यावर 12 महिन्यांची सरासरी महागाई 148.86 पर्यंत पोहोचली, तरच महागाई भत्ता 64% पर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत, यासाठी जून महिन्याचा AICPI-IW निर्देशांक 154.5 असला पाहिजे मात्र, गेल्या 12 महिन्यांचा कल पाहता हे इतकं सोपे नाही. पण, महागाई भत्त्यातील नेमकी वाढ सरकारच्या घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा