Headlines

DA Hike for Central Government Employees July 2026; 3% महागाई भत्ता वाढीबाबत महत्त्वाचे अपडेट! दसरा-दिवाळी गोड होणार, बेसिक पगाराच्या हिशेबाने हातात सॅलरी किती वाढणार, पाहा Calculation


DA Hike for June 2026 Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगासोबतच DA म्हणजे महागाई भत्ता वाढीबाबतही कुजबुज सुरू आहे. जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 3 टक्के वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. जुलै महिन्यात महागाई भत्त्यात 3% वाढल्यास एकूण भत्ता 63% पर्यंत पोहोचू शकतो.

DA Hike for Central Govt Employees July 2026
3% महागाई भत्ता वाढीबाबत महत्त्वाचे अपडेट! बेसिक पगाराच्या हिशेबाने हातात सॅलरी किती वाढणार?(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Central Govt Employees Update: आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष ठेवून असलेल्या केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो. 8 वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबद्दल अद्याप बैठका घेत असून पुढील वर्षी मे 2027 मध्ये आपला अंतिम अहवाल सादर करणे अपेक्षित आहे, पण त्याआधी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक DA (महागाई भत्ता) वाढीची भेट मिळणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट

जानेवारी 2026 नंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून नवीन डीए वाढ दिली जाईल, ज्याच्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल. जुलै 2026 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ अपेक्षित आहे, ज्यामुळे एकूण भत्ता 63 टक्क्यांवर पोहोचेल. यासह देशभरातील सुमारे 50.14 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन वाढेल.

Maharashtra TimesLPG Cylinder Price Today 1 August: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा; व्यावसायिक एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त! घरगुती गॅसच्या दराच काय?
जून 2026 च्या AICPI-IW आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढीचे संकेत मिळत आहेत. पण, सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता AICPI-IW डेटाच्या आधारे मोजला जातो. अर्थ मंत्रालयाच्या कामगार ब्युरोने जून 2026 मध्ये जाहीर केलेला AICPI-IW निर्देशांक 151.9 वर पोहोचला असून जुलै 2025 ते जून 2026 या 12 महिन्यांची सरासरी 148.65 आहे. यानुसार महागाई भत्त्याचे कॅलक्युलेशन अंदाजे 63.76% इतके होते.

Maharashtra TimesTenant Rights: भाडेकरू आहात? घरमालक Rent Receipt देत नसेल तर घाबरू नका! जाणून घ्या तुमचे हक्क, वादावर लागेल ब्रेक

3% डीए वाढीवर पगार किती वाढणार?

अशाप्रकारे, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA जुलैपासून 3 टक्के वाढल्यास एकूण महागाई भत्ता 63 टक्के होईल. अशा परिस्थितीत, एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 30,000 रुपये असेल, तर पगारवाढ साधारणपणे खालीलप्रमाणे असेल:

  • मूळ पगार 30000 रुपये
    सध्याचा 60% महागाई भत्ता 180000 रुपये
    63% महागाई भत्ता 18,900 रुपये

म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगारात 900 रुपयांची वाढ होईल, जी वार्षिक आधारावर 10,800 रुपये होईल. म्हणजेच मूळ पगार जितका जास्त असेल, तितका महागाई भत्ता वाढवण्याचा फायदा जास्त मिळेल.

महागाई भत्त्यातील 3% वाढीमुळे पगारात किती बदल होईल?

वेतन स्तर किमान मूळ वेतन (प्रति महिना) महागाई भत्त्याची रक्कम (60% दराने) महागाई भत्त्याची रक्कम (63% दराने) दरमहा पगारवाढ सहा महिन्यांची थकबाकी
लेव्हल 1 18,000 रुपये 10,800 रुपये 11,340 रुपये 540 रुपये 3,240 रुपये
लेव्हल 2 19,900 रुपये 11,940 रुपये 12,537 रुपये 597 रुपये 3,582 रुपये
लेव्हल 3 21,700 रुपये 13,020 रुपये 13,671 रुपये 651 रुपये 3,906 रुपये
लेव्हल 4 25,500 रुपये 15,300 रुपये 16,065 रुपये 765 रुपये 4,590 रुपये
लेव्हल 5 29,200 रुपये 17,520 रुपये 18,396 रुपये 876 रुपये 5,256 रुपये
लेव्हल 6 35,400 रुपये 21,240 रुपये 22,302 रुपये 1,062 रुपये 6,372 रुपये
लेव्हल 7 44,900 रुपये 26,940 रुपये 28,287 रुपये 1,347 रुपये 8,082 रुपये
लेव्हल 8 47,600 रुपये 28,560 रुपये 29,988 रुपये 1,428 रुपये 8,568 रुपये
लेव्हल 9 53,100 रुपये 31,860 रुपये 33,453 रुपये 1,593 रुपये 9,558 रुपये
लेव्हल 10 56,100 रुपये 33,660 रुपये 35,343 रुपये 1,683 रुपये 10,098 रुपये
प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा