Headlines

Controversial statement by ambernath eknath shinde shivsena leader sadashiv patil on corruption; ‘थोडा भ्रष्टाचार झालाच पाहिजे’; शिंदेंच्या शिवसेनेचा उपनगराध्यक्ष सर्वांसमोर हे काय बोलून गेला? चहूबाजूने टीकेची झोड


Eknath Shinde News: पाटील यांच्या या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

eknath shinde shivsena
‘थोडा भ्रष्टाचार झालाच पाहिजे’; शिंदेंच्या शिवसेनेचा उपनगराध्यक्ष सर्वांसमोर हे काय बोलून गेला? चहूबाजूने टीकेची झोड!(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ: अंबरनाथ नगरपरिषदेत शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. नालेसफाईच्या कामांदरम्यान भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना पाटील यांनी, ‘थोडाफार भ्रष्टाचार आणि चोरी झालीच पाहिजे’ असे विधान केल्याने सभागृहातील सदस्यही काही काळ अवाक् झाले. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेले सदाशिव पाटील यांनी आपल्या चार नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला देत उपनगराध्यक्षपद मिळवले. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांनुसार शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्याने नगरपरिषदेत प्रभावी विरोधी पक्ष उरलेला नाही. युतीनंतरची ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने विषयपत्रिका सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन तयार करण्यात आली होती.

सभेसमोर तब्बल ३३६ विषय ठेवण्यात आले होते. विरोधी पक्ष नसतानाही काही विषयांवर शिवसेना-भाजपच्या सदस्यांमध्ये मतभेद दिसून आले. नालेसफाईच्या कामांवरील चर्चेदरम्यान भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पाटील यांनी हे विधान केल्याने एकच खळबळ उडाली. उपनगराध्यक्ष पाटील हे चुकीचे विधान करत असल्याचे नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी त्यांना लक्षात आणून देत अप्रत्यक्ष समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही पाटील यांनी सभागृहात उपस्थित एका अभियंत्यांकडे पाहत, ‘भ्रष्टाचार आणि चोरी झालीच पाहिजे’ या वक्तव्याचा पुरुच्चार केला. त्यांच्या वक्तव्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर नव्याने राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, सदाशिव पाटील यांचे हे पहिलेच वादग्रस्त प्रकरण नाही. यापूर्वी अंबरनाथ पूर्वेतील बि कॅबिन मार्गावरील पालिकेच्या अर्धवट आणि कच्च्या पुलावरून वाहने चालवून त्या पुलाचे उद्घाटन केल्यामुळे पाटील यांच्यावर टीका झाली होती.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा