CM devendra fadnavis wife amruta fadnavis reaction on jen z and delhi jantar mantar protest; जेनझीवर टीका करण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा आणि सुविधा देण्याची गरज; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
CM devendra fadnavis wife amruta fadnavis reaction on jen z and delhi jantar mantar protest; जेनझीवर टीका करण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा आणि सुविधा देण्याची गरज; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतरवरील जेनझी आंदोलनावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जेनझीच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. आंदोलनाची सुरुवात योग्य दिशेने होती, मात्र नंतर काही अँटी-सोशल एलिमेंट्स सहभागी झाल्याने आंदोलनाची दिशा बदलली आणि ते डायरेक्शनलेस झाले, अशी टीका त्यांनी केली. मात्र, केवळ त्यावरून संपूर्ण जेनझीवर टीका करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, जंतर-मंतरवरील आंदोलनाची सुरुवात पेपर लीकच्या प्रश्नापासून झाली आणि सुरुवातीला हा मुद्दा योग्य दिशेने जात होता. मात्र, त्यानंतर आंदोलनात काही वेगवेगळे अँटी-सोशल एलिमेंट्स सहभागी झाले. त्यामुळे वातावरण बदलले आणि आंदोलनाचा मूळ मुद्दा बाजूला पडत ते दिशाहीन झाले. जर आंदोलनाने सुरुवातीचा मुद्दा कायम ठेवला असता, तर ते अधिक रिलिव्हंट राहिले असते, सरकारने परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत यापूर्वीच काही पावले उचलली आहेत आणि त्यावर काम सुरू असल्याचेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.
अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, देशाने 2047 चे ध्येय ठेवले आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या संकल्पना प्रत्यक्षात यशस्वी करायच्या असतील तर देशातील जेनझीचा त्यामध्ये सक्रिय सहभाग आवश्यक आहे. युवकांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण, रोजगार आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
दरम्यान, वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताच्या मुद्द्यावरही अमृता फडणवीस यांनी भूमिका मांडली. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत असून राष्ट्रगीताबरोबर ते म्हणण्याचा निर्णय संसदेत झाला आहे. संसद ही संविधानामुळे अस्तित्वात आहे. त्यामुळे संविधानाचा आदर आणि पालन न करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
गडचिरोलीतील सर्पदंशाच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले. अशा दुर्दैवी घटनांचा पाठपुरावा करून त्यामागचे कारण शोधले पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महिलांवरील आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही केवळ कारवाई न करता त्यामागची कारणे शोधून त्यावर उपाय करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मस्वातंत्र्य कायद्याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या की, या माध्यमातून महिलांना अधिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल. लग्न झालेली महिला असो किंवा मुलगी, तिला स्वतःच्या आयुष्याबाबत निर्णय घेता आला पाहिजे आणि हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर तिरंगाचा केक कापण्याच्या प्रकारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तिरंगा घालणे किंवा परिधान करणे योग्य नसेल, तर तिरंग्याचा केक कापणे कसे योग्य ठरू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बुद्धिबळपटू दिव्या देशमुखला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्याच्या यशाबाबत अमृता फडणवीस यांनी तिचे कौतुक केले. दिव्याने बुद्धिबळात केलेली प्रगती अभिमानास्पद असून राष्ट्रपतींच्या हस्ते तिला पदक मिळत आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठविण्याच्या चर्चेवर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्रजी हे नागपूरचे आणि महाराष्ट्राचे सेवक आहेत. त्यांना महाराष्ट्रातच सेवा करू द्या, त्यांना इथली सेवा करू द्या, त्यांना बाहेर का पाठवत आहे..? महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्र ही देशातील अग्रणी राज्य असून जबाबदारी मोठी आहे. इथे जबाबदार व्यक्ती म्हणून देवेंद्रजी आहेत याचा मला आनंद आहे. त्यामुळे त्यांना येथेच काम करू द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा