Headlines

CM Devendra Fadnavis Sang Gulabi Aankhen Jo Teri Dekhi Song in Nagpur Program Video Goes Viral


नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोपात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणे गाऊन उपस्थितांची मने जिंकली. दोन्ही नेत्यांचा गाणी म्हणत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Devendra Fadnavis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप आज पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रख्यात गायिका षण्मुखप्रिया यांच्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम आयोजिक करण्यात आलेला. यावेळी गायिका षण्मुखप्रिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गाण्याचा आग्रह केला. या आग्रहाखातर नितीन गडकरी यांनी गाणे गायले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील गायिका षण्मुखप्रिया यांनी दोन ओळी गाण्याचा आग्रह केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी…’ या गाण्याच्या दोन ओळी गायल्या. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला. तसेच या प्रसंगाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. नितीन गडकरी यांनी “जिंदगी कैसी है पहेली” हे गाणे सादर केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया” हे गाणे गाऊन कार्यक्रमात रंग भरला. नागपुरातील सुरेश भट सभागृह येथे आयोजित नागपूर खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात हा विशेष संगीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या गायन सत्रात दोन्ही नेत्यांनी गाणी सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले?

नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी-सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होत असलेल्या क्रीडा महोत्सवाचा प्रतिसाद सातत्याने वाढत असून अनेक खेळाडूंना यानिमित्ताने संधी आणि प्रशिक्षण उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून नागपुरात एक क्रीडा संस्कृती आकारास येत आहे. क्रीडा क्षेत्र हे सातत्याने बदलत असून अभ्यासासोबतच आता क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यावरही मोठा भर दिला जात आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकता आली आहे. त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या क्षेत्रातील दालने उपलब्ध झाली आहेत. खेळ ही अशी संस्कृती आहे ज्यामुळे युवा पिढी योग्य दिशेने वाटचाल करू शकते. त्यातून स्पर्धात्मक वृत्ती देखील तयार होत असल्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

नागपुरात क्रीडा संस्कृतीला आणखी चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. देशातील अत्यंत आधुनिक असे क्रीडा संकुल मानकापुरात तयार होत आहे. यानिमित्ताने येथे जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करता येईल. क्रीडा विद्यापीठ देखील तयार होत आहे. एकूणच या सोयीसुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय म्हणाले?

आगामी खासदार महोत्सवाचे आयोजन व्यापक स्तरावर म्हणजेच विदर्भस्तरावर केले जाईल. त्यात एक लाखावर खेळाडू सहभागी होतील असे प्रयत्न केले जातील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

नागपूर हे क्रीडा राजधानी म्हणून उदयास यावे यासाठी शहरातील क्रीडा सुविधा मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहेत. शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहराच्या सर्वच भागात क्रीडा सुविधांची उभारणी होणार असून शहरातील किमान एक लाख मुले-मुली सायंकाळी क्रीडा मैदानावर दिसावीत, असे आमचे स्वप्न असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा