Headlines

Chinmayee Sumeet : ‘पक्षाप्रमाणेच निरर्थक गोष्टी करतायत, बेरोजगारी वाढवायची, मुलांचा आत्मसन्मान दुखवायचा’, कंगना रणौतवर चिन्मयी सुमीतचा संताप


Chinmayee Sumeet : जेन-झींना ‘जनरेशन गटार’ म्हणणाऱ्या कंगना रणौतला मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीतनं प्रत्युत्तर दिलं आहे.

Chinmayee Sumeet On Kangana Ranaut
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – कंगना रणौतनं ‘जेन-झी’ मुलींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आणि राजकारणातही बराच गोंधळ उडाला आहे. अनेकांनी कंगनावर टीका केली आहे. अशातच आता मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीतनं कंगनाच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या चिन्मयी सुमीत ?

एका वृत्तवाहिनीसोबत साधलेल्या संवादात चिन्मयी सुमीत म्हणाल्या की, ‘कंगना रणौत अत्यंत अभ्यासू वक्त्या आहेत, त्यामुळे अभ्यास केल्याशिवाय त्या कधीच काही बोलत नाहीत. आणि कंगना रणौत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, या वाक्यालाच काहीच अर्थ नाही. कारण, त्या जेव्हा वक्तव्य करतात, ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुतेक बोलतात. त्यामुळे छान आहे, त्यांनी जे म्हटलंय ते अगदी योग्यच असणार. कारण त्या त्यावेळेस संसदेच्या खिडकीतून बघत असणार की, कोण आलेत समोर ? त्यांनीच असं म्हटलं होतं की, पोलिसांचं कौतुक केलं होतं. जर ही मुलं आत आली असती तर त्यांनी काय केलं असतं माहिती नाही. त्यामुळे त्यांनी कुठून बघितलं की, विद्यार्थी होते की, नव्हते हे मला खरंच कळत नाहीये. पण जर त्या म्हणतायत तर त्यांना कोणतीतरी आंतरिक शक्ती मिळाली असेल, ज्यामुळे त्यांना माहित आहे की, ते विद्यार्थी कोण आहेत किंवा आंदोलनात विद्यार्थी नाहीच आहेत, हे त्यांना माहीत आहे. त्या अगाध आहेत, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो.’
Maharashtra TimesPrajakta Kulkarni : रील्स स्टार्सना सेटवर धड वाक्य बोलता येत नाही! प्राजक्ता कुलकर्णी यांची खंत; म्हणाल्या, ‘फॉलोअर्स बघून कामं मिळतात’
चिन्मयी पुढे म्हणाल्या की, ‘हे मी अत्यंत मनापासून सांगतेय की, कंगना उत्तम अभिनेत्री आहेत. मला ‘क्वीन’मध्ये त्या खूप आवडल्या होत्या आणि आता त्यांनी ही जी भूमिका करायला घेतली आहे, त्यातसुद्धा त्या आपलं शंभर टक्के योगदान देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं जे काही सुरू आहे की, सतत काहीतरी निरर्थक आणि बेसलेस गोष्टी बोलत राहायच्या, तर तेच त्या करत आहेत. तेच त्या १०० टक्के प्रेमानं करत आहेत. आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं. पण मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलं त्यात मला ८० टक्के मुलं दिसली आणि २० टक्के आमच्यासारखे लोक जे त्यांना पाठिंबा द्यायला गेले होते, असे लोक मी तरी बघितले.’

GenZ पिढी भारताचे भविष्य, पण त्यांना सांगणं कठीण; विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य

‘आतासुद्धा मुलांच्या भाषेबद्दल बोललं जात आहे, ती भाषासुद्धा २० टक्के मुलांनी बोललेली मुलांची भाषा होती. माझ्यासोबत जी माझी दोन मुलं होती, ते ज्या घोषणा देत होते, त्यांच्या हातात ज्या पाट्या होत्या त्या मी बघत होते. त्यात निश्चित ते नव्हते. त्यामुळे आता जर मी असं म्हणायचं ठरवलं की, माझ्या दोन मुलांकडे बघून मी त्या मानानं अंदाज लावते आणि मी म्हणते की, कोणी शिव्याच दिल्या नाहीत, तर ते जितकं खोटं होईल तितकं ह्या बाई म्हणत आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही.’
Maharashtra TimesKritika Tulaskar : ‘कलाकार म्हणून स्विच ऑन स्विच ऑफ होणं गरजेचं’, कृतिका तुळसकरनं ओढले ताशेरे, म्हणाली, ‘माझ्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही’
‘बेरोजगारी वाढवायची, मुलांना नोकऱ्या मिळू द्यायच्या नाहीत, त्यानंतर त्यांना झुरळं म्हणायचं आणि त्यांचा आत्मसन्मान दुखवायचा, हे करतायत. आता ‘जनरेशन गटर’ म्हणून अपमानावर तुम्ही अपमान करताय. दलदलीत एकदा पाय ठेवला, की तो आत-आत जात जातो. असंच त्यांचं झालंय सगळ्यांचं… त्यामुळे जितकी ते घाण माजवतील, तितकेच ते गाळात जातील, एवढंच मी आता म्हणू शकते. त्यांना लवकर बरं वाटूदे एवढीच सदिच्छा.’ असं चिन्मयी यांनी शेवटी म्हटलं. ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीसोबत साधलेल्या संवादात चिन्मयी सुमीत बोलत होत्या.