Headlines

जपानी लोकांचे सिक्रेट क्लीनिंग हॅक्स! समजून घ्या कायझेन क्लीनिंग पद्धत घर नेहमी दिसेल नव्यासारखे, आवरण्याची गरजच नाही – 6 japanese cleaning hacks to keep your home organized, fresh & beautiful every day


जपानी लोकांची स्वच्छतेची पद्धत फक्त घर चमकवण्यासाठी नाही, तर जीवन अधिक सोपे आणि शांत बनवण्यासाठी आहे.कमी वस्तू, योग्य नियोजन आणि छोट्या सवयींमुळे त्यांचे घर नेहमी नीटनेटके व फ्रेश दिसते.चला जाणून घेऊया जपानचे 6 खास क्लीनिंग हॅक्स, जे तुमच्या घराचा लुक पूर्णपणे बदलू शकतात.

Japanese Cleaning Hacks
फोटो सौजन्य :- @iStock
घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी अनेकदा तासन्‌तास मेहनत घ्यावी लागते. मात्र जपानी लोकांची जीवनशैली पाहिली तर त्यांच्याकडे घर स्वच्छ ठेवण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन दिसतो. ते फक्त साफसफाई करत नाहीत, तर अशा काही सवयी अंगीकारतात ज्यामुळे घर कायम व्यवस्थित, सुंदर आणि शांत वाटते.जपानमध्ये स्वच्छता ही केवळ घरातील धूळ काढण्याची प्रक्रिया नसून मानसिक शांततेचा एक भाग मानली जाते. कमी वस्तू, योग्य नियोजन आणि छोट्या-छोट्या सवयींमुळे त्यांचे घर नेहमी ताजेतवाने दिसते. त्यांच्यासाठी स्वच्छ घर म्हणजे फक्त पाहुण्यांना दाखवण्यासाठी केलेली सजावट नाही, तर स्वतःच्या मनाला आराम देणारी जागा आहे.

जपानी संस्कृतीमध्ये “शिस्त” आणि “साधेपणा” यांना खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे ते घरातील प्रत्येक वस्तू विचारपूर्वक ठेवतात. घरात अनावश्यक वस्तूंचा साठा न करता फक्त गरजेच्या गोष्टी ठेवण्यावर त्यांचा भर असतो. यामुळे घरात मोकळी जागा राहते आणि वातावरण अधिक सकारात्मक वाटते.
आपल्या घरात अनेकदा वस्तू जास्त असल्यामुळे पसारा वाढतो आणि साफसफाईचे कामही वाढते. पण जपानी पद्धत आपल्याला शिकवते की, कमी वस्तूंमध्येही घर सुंदर आणि आरामदायी बनवता येते.तसेच जपानी लोक मोठ्या साफसफाईसाठी एखाद्या खास दिवसाची वाट पाहत नाहीत. ते रोजच्या छोट्या सवयींमधून घर स्वच्छ ठेवतात. वापरलेली वस्तू लगेच जागेवर ठेवणे, स्वयंपाक झाल्यानंतर किचन स्वच्छ करणे आणि घरातील छोट्या भागांची नियमित काळजी घेणे यामुळे त्यांना मोठ्या साफसफाईचा त्रास कमी होतो.या सवयी केवळ घर सुंदर ठेवत नाहीत, तर वेळेची बचतही करतात. स्वच्छ आणि व्यवस्थित वातावरणामुळे मनावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते आणि दिवसाची सुरुवात अधिक सकारात्मक पद्धतीने करता येते. (फोटो सौजन्य :- @iStock)

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा