Headlines

Chhaya Kadam : ‘खासगी गोष्टी जगासमोर का आणायच्या?’ छाया कदम यांना आलेली हिंदी बिग बॉसची ऑफर, अभिनेत्रीनं सांगितलं नकार देण्याचं कारण


Chhaya Kadam On Bigg Boss : छाया कदम यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हिंदी बिग बॉसबद्दल भाष्य केलं आहे. त्यांना बिग बॉसची ऑफर आलेली, मात्र अभिनेत्रीनं नकार दिलेला.

Chhaya Kadam On Bigg Boss And Maharashtrachi Hasyajatra
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री छाया कदम सध्या त्यांच्या ‘भूतम् भयम्’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये छाया कदम यांनी बिग बॉस हिंदीबद्दल भाष्य केलं आहे. छाया कदम यांना बिग बॉस हिंदीसाठी विचारणा झालेली, असं त्यांनी सांगितलं आहे.

छाया कदम यांना आलेली बिग बॉसची ऑफर

मुलाखतीदरम्यान रिअॅलिटी शोबद्दल विचारलं असता छाया कदम यांनी सांगितलं की, ‘खरं सांगायचं तर मला हिंदी बिग बॉसची ऑफर आली होती. मी कान्समध्ये पहिल्यांदा गेले होते तेव्हा मला ऑफर आली होती. तेव्हा त्यांना असं वाटत होतं की, मी बिग बॉसमध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांनी त्यासाठी खूप प्रयत्नही केले, पण मला नाही जमलं. कारण माझं असं होतं की नाही आता तरी मला नाही करायचं आहे. पण हो हिंदी बिग बॉसची ऑफर आली होती.’

Celebrity Corner : धर्मवीरमधले राज ठाकरे ते लक्ष्मी निवासचा विश्वा, गोव्याच्या अनुज प्रभू सोबत गप्पा

पुढे रिअॅलिटी शोबद्दल विचारलं असता छाया कदम म्हणाल्या, ‘मला असं वाटतं की तुमच्या खासगी गोष्टी ज्या तुम्हालाच माहीत असतात, ज्या तुमच्याच आहेत त्याबद्दल मी जगासमोर का बोलू? त्यामुळे, मला नाही करायचा आहे, असं मी त्यांना सांगितलं. लोकांना खूप आवडतो. मी त्यांना सांगितलं की तुमचा टीआरपीवगैरे खूप छान आहे. मी जरी नाही म्हटलं असलं तरी माझ्या आजुबाजूचे लोक बिग बॉस बघतात. माझी मावशी खूप बघते. माझं ऐकत नाही तिला खूप आवडतं.’

Maharashtra TimesDev Anand : झीनत अमानच्या आकंठ प्रेमात बुडालेले देव आनंद, प्रपोज करण्यापूर्वी राज कपूर यांच्यामुळे मनाला लागली ठेच, काय घडलेलं?
पुढे कोणता रिअॅलिटी शो बघता असं विचारल्यानंतर छाया कदम म्हणाल्या की, ‘मी आमच्या मराठीतील ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ बघते. कारण, त्यातील कलाकार खूप चांगलं काम करतात. हसवता हसवता सामाजिक संदेशही देतात.’ ‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये छाया कदम बोलत होत्या.

Maharashtra TimesBrett Lee : प्रीती झिंटासोबतच्या अफेअरच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलला ब्रेट ली, ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटपटूनं सोडलं मौन
दरम्यान, छाया कदम यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘लापता लेडीज’, ‘मडगाव एक्स्प्रेस’, ‘फँड्री’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच बिग बॉस हिंदीबद्दल सांगायचं तर, ‘बिग बॉस २०’ चा प्रोमो प्रदर्शित झाला असून, हा सीझन पूर्णपणे वेगळा आणि ट्विस्टनं भरलेला असणार आहे. होस्ट सलमान खान एका वेगळ्या लूकमध्ये दिसतोय, पण २० वा सीझनसुद्धा एका नवीन स्टाईलमध्ये आहे. निर्मात्यांनी ‘बिग बॉस २०’ च्या प्रोमोसोबत प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. ‘बिग बॉस २०’चा प्रीमिअर ६ सप्टेंबर रोजी होणार आहे.