Headlines

Chhatrapati Sambhajinagar Youth Kidnapped Not Paying Sand Commission; रिक्षातून जाताना उचललं, जबरदस्ती गुड्डू भैय्याच्या थारमध्ये डांबलं, वाळूचं कमिशन न दिल्यानं संतापनजक प्रकार; नेमकं काय घडलं?


Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar Sand Commission Youth Kidnapped
संभाजीनगर वाळूचं कमिशन तरुणाचं अपहरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वाळूचे ३० ते ४० ट्रक परस्पर विकून त्यामधून मिळणारे कमिशन न दिल्याच्या कारणावरून रिक्षातून जाणाऱ्या युवकाचे चार जणांनी अपहरण केले. युवकाला जबरदस्तीने महिंद्रा थार गाडीमधून देवगाव रंगारी येथे नेण्यात आले. या ठिकाणी मारहाण करून मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. अपहरणाची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी युवकाची १२ तासांत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी युवकाचे अपहरण करणारे जाफर ऊर्फ गुड्डू अय्युब शेख, जावेद अमीन शेख आणि अनस अय्युब शेख या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

थारमध्ये जबरदस्ती नेलं

या प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान फकीरचंद ऊर्फ मनीष शामसिंग महेर याला सिडको उड्डाणपुलाखाली एका रिक्षातून तिघांनी त्यांची थार कारमध्ये जबरदस्तीने टाकून नेले. महेर याला थार कारमधून उदय मोतीला मरमट ऊर्फ राजपूत, जावेद अमीन शेख, अनस चाऊस, आणि गुड्डू शेख यांनी अपहरण केले. या चौघांनी मनीष महेर याला देवगाव रंगारी येथे कारमधून नेले.
Maharashtra TimesSunetra Pawar : तुमचं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात जिवंत राहील, अजितदादांच्या जयंतीला सुनेत्रा पवार भावूक, अश्रू थांबायचं नाव घेईनात

कपडे फाडून मोबाइलवर व्हिडिओ काढला

अपहरण करणाऱ्यांमध्ये आणि मनीष महेर यांच्यात वाळू पुरवठ्यामध्ये कमिशनवरून वाद झाले. या वादानंतर चौघांनी बळजबरीने लाकडी दांड्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली; तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरणकर्त्यांनी जुन्या बंगल्याच्या समोरील मोकळ्या जागेत नेऊन मारहाण केली. कपडे फाडून मोबाइलवर त्यांचा व्हिडिओ चित्रित करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
Maharashtra TimesDelhi Protest: मंत्र्यांच्या मुलांना अशी मारहाण केली असती का? दिल्लीतील आंदोलनात सहभागी भारत बानाईतच्या आई-वडिलांचा संताप अनावर

छापा टाकताच पसार

या प्रकरणात अपहरण प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही पाहणी केली. यानंतर पोलिसांनी आरोपींची शोध व लोकेशन तपासून देवगाव रंगारी येथून जाफर अय्युब शेख, जावेद शेख, अनस चाऊस या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी छापा टाकताच उदय मोतीला मरमट ऊर्फ राजपूत आणि दोन अनोळखी साथीदार पसार झाले. या प्रकरणात अपहरण कर्त्यांच्या तावडीतून सुटका झालेल्या मनीष महेर याच्या तक्रारीवरून अपहरणकर्त्यांच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा