Headlines

Chhatrapati Sambhajinagar Tisgaon Khavdya Dongar Chandgude Family Death Case Sangita Chandgude Youtuber Video; कुणालची आई युट्युबर, व्हिडिओतून दिली महत्त्वाची माहिती; खवड्या डोंगर प्रकरणात कौटुंबिक वादाचा नवा अँगल


Chhatrapati Sambhajinagar Tisgaon Khavdya Dongar Accident : कुणाल चांदगुडेची आई संगीता चांदगुडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Tisgaon Khavdya Dongar Accident
खवड्या डोंगर चांदगुडे कुटुंब मृत्यू प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुणाल चांदगुडे या तरुणानं तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर जाऊन टोकाचं पाऊल उचललं. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे पुढे सरसावले आणि त्यांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा आता नवा अँगल देखील समोर आला आहे. कुणाल चांदगुडेची आई संगीता चांदगुडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी बऱ्याच लोकांवर आणि कौटुंबिक वादाबाबत आणि घरातील परिस्थितीबाबत भाष्य केल्याचं दिसून येतं. कुणालची आई म्हणजेच संगीत चांदगुडे या युट्युबर असल्याचंही समोर आलं आहे.

संगीता चांदगुडे यांनी व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलं होतं?

संगीता चांदगुडे यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या संसारात एका अज्ञात महिलेच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण होत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. तसेच सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला आणि त्यानंतर घरातील वाद अधिक वाढल्याचंही त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितल्याचं समोर आलं आहे. या काळात काही लोकांकडून आपल्याला आणि पतीला त्रास झाल्याचाही दावा संगीता चांदगुडे यांनी केला होता.

Maharashtra Timesआयफोनवरून वाद, कुणालची डोंगरावरून उडी, आई, वडिलांचाही शेवट; आता घरी ‘तो’ एकटाच, अन्न-पाणी सोडलं

मुरलीधर चांदगुडे यांनाही मानसिक धक्का

मुलाच्या मृत्यूच्या घटनेनंतर मुरलीधर चांदगुडेयांनाही या परिस्थितीचा मानसिक धक्का बसल्याचं त्यांनी सांगितल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येतं. दरम्यान, या सोशल मीडिया व्हिडिओमधील दावे आणि खवड्या डोंगरावरील घटनेचा नेमका संबंध काय? याचा तपास पोलिसांकडून होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सोशल मीडिया पोस्टमधील आरोपांना अधिकृत निष्कर्ष न मानता, पोलीस तपासातून नेमकं सत्य समोर येणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता. आयफोन 15 मोबाईलसाठी हट्टाला पेटलेला मुलगा जीव देण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. त्यानंतर तो सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता.

Maharashtra TimesKhavdya Dongar News: माझा संसार उद्ध्वस्त केलास; चांदगुडे कुटुंबाला नक्की कोणापासून त्रास? खवड्या डोंगरप्रकरणी आईचा आधीचा व्हिडिओ व्हायरल

मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला

अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचं पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. तिघांचे मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा