Headlines

Chhatrapati Sambhajinagar Crime: मालमत्तेच्या वादातून भयंकर प्रकार; पोटच्या मुलानेच वडिलांना निर्घृणपणे संपवलं, घटनेनं खळबळ – chhatrapati sambhajinagar 45 yrs old son ends his father over property dispute


Chhatrapati Sambhajinagar Crime: बापाला वाचविण्यासाठी तिची बहिण आली असता, तिच्यावरही अब्दुल रहेमान याने वार करून जखमी केले.

nagpur crime
नागपूर क्राईम(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सिल्क मिल परिसरात मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांवर धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (११ जून) सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. या घटनेत बापावर हल्ला केल्यानंतर मुलाने त्याच्या बहिणीवरही धारदार हत्याराने वार करून जखमी केले.

मृताचे नाव सय्यद जफर करीमोद्दीन पटेल (वय ८४, रा. अबरार कॉलनी) असे आहे. मारेकऱ्याचे नाव अब्दुल रहेमान जफर पटेल (वय ४५, रा. सिल्कमिल कॉलनी) असे असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली.

Maharashtra Times15 वर्षांची प्रतीक्षा, थाटात लग्न; पण नियतीचा अत्यंत क्रूर डाव, लग्नाच्या अवघ्या सातव्या दिवशी नवविवाहितेचा दुर्दैवी अंत
या प्रकरणी सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्क मिल कॉलनी परिसरात सय्यद जफर पटेल यांचे आणि त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान या दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाने जफर पटेल यांच्या बाजूने निकाल दिला. वादग्रस्त जागेवर गुरुवारी सय्यद जफर पटेल व त्यांची मुलगी तसेच अन्य काही जण हे आले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार जफर पटेल यांनी मालमत्तेचा ताबाही घेतला. मालमत्ता ताब्यात घेऊन जफर पटेल हे मुलीसोबत रिक्षातून त्यांच्या घराकडे जात होते. अब्दुल रहेमान याने रिक्षापुढे दुचाकी आणून उभी केली. जफर पटेल यांचे वाहन अडविताच, रहेमान याने बापावर चाकूने सपासप वार केले.

बापासह बहिणीवर हल्ला करून अब्दुल रहेमान हा पळून गेला.दरम्यान, आसपासच्या नागरिकांनी जखमी जफर पटेल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी जफर पटेल यांना तपासून मृत घोषित केले, तसेच जफर पटेल यांच्या मुलीवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashtra TimesCrime News: ७ वीतील मुलीला नशेचं औषध पाजलं, बेशुद्ध होताच काका-पुतण्याकडून अत्याचार; नंतर व्हिडिओही बनवले, अखेर नराधमांना अटक
या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांच्यासह पोलिस अंमलदार महेश गोले, दिगंबर राठोड, सुनील बेलकर यांनी धाव घेतली. मारेकरी अब्दुल रहेमान याला नातेवाइकांकडून ताब्यात घेतले. या प्रकरणात उशिरापर्यंत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. वाद नेमका कशामुळे झाला याची माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आठ ते दहा महिन्यांपासून मारहाण
मृत जफर पटेल हे अबरार कॉलनी येथे राहत होते. त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान हा शिक्षित असून तो परिवारासह सिल्कमिल कॉलनीत राहत होता. या सिल्कमिल कॉलनी परिसरातील मालमत्तेवरून बाप लेकामध्ये वाद सुरू होते. आठ ते दहा महिन्यांपासून हे वाद सुरू होते. अब्दुल रहेमान याला परिसरात डॉक्टर म्हणून ओळखत होते. तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करीत होता, अशी प्राथमिक माहिती सातारा पोलिसांनी दिली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा