Headlines

Chhagan Bhujbal: जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया – chhagan bhujbal big statement o delhi jantar mantar protest


Chhagan Bhujbal On Jantar Mantar Protest: जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या, अशी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. आणखी काय म्हणाले?

chhagan bhujbal (1).
छगन भुजबळ(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: ‘दिल्लीतील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटना यातना देणाऱ्या असून त्या टाळता आल्या असत्या, जे घडले ते सर्वांसमोर आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. दिल्लीतील वरिष्ठ नेते या प्रश्नात लक्ष घालून तो सोडवतील,’असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘विरोधकांना संधी मिळाली की मुद्दा वाढवण्याचे काम करतात,’ अशी टीकाही त्यांनी केली.

नाशिकमध्ये बुधवारी (दि. २२) ते पत्रकारांशी बोलत होते. ‘आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक चिघळू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटना टाळता आल्या असत्या, तर अधिक चांगले झाले असते,’ असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Maharashtra TimesNashik News: चिखलमय महामार्गावर ‘आपटी’! शंभरावर दुचाकी घसरुन अनेकजण जायबंदी, थेट रुग्णवाहिका तैनात करण्याची वेळ
‘सुनेत्रा पवारांना ताकद देणे गरजेचे’
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रूपात आपण अजितदादांना पाहू या. त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे काम करीत आहेत. पक्षाने सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून, महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताकद देणे गरजेचे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra TimesCJP Protest Delhi: सख्खा भाऊ गेलाय, आम्हाला न्याय हवा…! नाशिकच्या तरुणाची व्यथा; मोर्चासाठी गाठली दिल्ली
अजितदादांच्या आठवणीने भावुक
स्व. अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करताना मंत्री भुजबळ भावुक झाले. ‘मागच्या वर्षी वाढदिवस साजरा केला, पण यावर्षी जयंती होत असून, ही अतिशय दुःखद बाब आहे. अजित पवार यांनी सहकार, शिक्षण, महिला सक्षमीकरण यासह सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले. सकाळी ६ वाजताच कामासाठी बाहेर पडणारे आणि दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी निधीची तरतूद करण्यातही अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची होती,’ असे भुजबळ म्हणाले.

Maharashtra TimesNashik News: रिक्षा प्रवासास मोजावे लागणार जादा पैसे, नाशिकमध्ये ‘आरटीओ’द्वारे सुधारित भाडेदर लागू; किती असतील दर?
यशला न्याय मिळवून देण्यासाठी आज आंदोलन
सिन्नर : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या धक्क्याने सिन्नर तालुक्यातील होतकरू विद्यार्थी यश गोसावी याने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. यशच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आज (दि. २३) सकाळी १० वाजता सिन्नरच्या आडवा फाटा येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तसेच तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या सहभागातून हे आंदोलन होणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा