Headlines

Chandrapur News: गर्भवती पत्नीचा मृत्यू; पतीने बांधला 1.5 KM रस्ता, चंद्रपूरच्या घोडनकप्पीतील ‘मांझी’चा सकारात्मक प्रयास – no road chandrapur husband builds 1.5km village path after pregnant wife dies


Chandrapur News: सुरुवातीला एकट्याने सुरू केलेल्या या कामाला नंतर ग्रामस्थांची साथ मिळाली आणि त्यांनी मिळून थेट रस्ताच उभारला. तुळशीराम गेडाम हे या ध्येयवेड्याचे नाव.

Anderson Phillip Catch - 2026-08-18T145233
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: महाराष्ट्र-तेलंगण सीमेवर वसलेले घोडनकप्पी हे दुर्गम गाव. या गावाला जोडणारा रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. रुग्णालयात पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे गर्भवती पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खचून न जाता, पुन्हा कोणत्याही गर्भवती महिलेचा रस्त्याअभावी जीव जाऊ नये म्हणून कुदळ आणि फावडे हाती घेतले.

बिहारमधील ‘माउंटन मॅन’ दशरथ मांझी यांच्या कहाणीची आठवण देणारी ही घटना. दोन महिन्यांपूर्वी; १४ जून रोजी तुळशीराम यांची गर्भवती पत्नी संगीता यांना प्रसूत वेदना सुरू झाल्या. असह्य वेदना होत असताना त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाला आणि संगीता यांचा मृत्यू झाला.

Maharashtra TimesSangli Crime : कचरा टाकण्यावरुन वाद, पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, बायकोचा जागीच मृत्यू; नवऱ्याचीही रुग्णालयात प्राणज्योत मालवलीपत्नीच्या मृत्यूनंतर तुळशीराम यांनी आणखी वाट न पाहता गावाला रस्ता मिळवून देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ग्रामस्थांना एकत्र केले आणि रस्त्याचे महत्त्व पटवून दिले. ‘सरकारच्या भरवशावर बसून राहण्यापेक्षा आपण स्वतः रस्ता तयार केला पाहिजे. आज माझ्यावर वेळ आली आहे, उद्या तीच वेळ इतर कोणावरही येऊ शकते’, असे त्यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले.

Maharashtra TimesJalgaon News : ग्रामसभेत वादाचा थरार, ग्रामस्थांची प्रश्नांची सरबत्ती; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूतुळशीराम यांच्या आवाहनाला ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिला. जागतिक आदिवासीदिनाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी श्रमदानाला सुरुवात केली. पाहता पाहता दीड किलोमीटरचा रस्ता तयार झाला. हा रस्ता उभारण्यासाठी गावातील सुमारे २० कुटुंबे एकत्र आली. याच गावातील लोक यापूर्वी रुग्णांना झोळीमध्ये घेऊन रुग्णालयापर्यंत नेत होते. आता रस्ता तयार झाल्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध नसली तरी बैलगाडी किंवा इतर वाहनाच्या मदतीने रुग्णांना रुग्णालयात नेणे शक्य होणार आहे. प्रशासनाने आता सिमेंट रस्त्यासाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा