Headlines

Bus Stop Accident | एसटीची वाट पाहणाऱ्या चिमुकलीला कारची जोरदार धडक; ५ वर्षीय तनस्वी गंभीर जखमी


तासगाव -तासगांव तालुक्यातील येळावी येथे एस टी बस थांब्यावर थांबलेल्या एका ५ वर्षीय चिमुकलीला चार चाकीने मागून धडक दिली. या अपघात ती चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून चारचाकी गाडी चालकाविरूध्द तासगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात तनस्वी केशव जाधव, बय ५ ही चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. तर याप्रकरणी शर्मिला महादेव जाधव, रा. पुजारी बस्ती, येळावी, ता. तासगांव यांनी चार चाकी गाडी चालक सागर सत्याप्पा माने, रा. पांझेलर वाडा, कोर्तालीम मारमु, राज्य गोवा यांच्याविरूध्दफिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी या अंगणवाडीमधून ड्युटी संपवून त्यांची पुतणी तनस्वी तसेच फिर्यादींचे सोबत कामाला असणाऱ्या माने रा. येळावी असे येळावी गावातील माने मळयाजवळील एस. टी. बस थांबा येथे थांबले होते. दरम्यान येळावीकडून चार चाकी गाडी क्रमांक जीए-०६-एफ-५७३३ ही आली. या गाडीने फिर्यादी यांची पुतणी तनस्वी जाधव हिला मागून जोराची धडक दिली. यामध्ये तनस्वी जखमी झाली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत