Headlines

Buldhana Borakhedi 17 Year Old Mentally Disability Girl Body Found in River; घरातून सकाळी निघाली, दुसऱ्या दिवशी नदीत निर्वस्त्र अवस्थेत बॉडी; गतिमंद मुलीसोबत नेमकं काय घडलं? महाराष्ट्र हादरला


Buldhana Crime News : बुलढाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 17 वर्षीय गतीमंद मुलीचा मृतदेह नदीपात्रात निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Buldhana Crime News
बोराखेडी मुलीचा मृतदेह नदीत आढळला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमोल सराफ, बुलढाणा : बुलढाण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरातून सकाळी 10 वाजता एक 17 वर्षीय गतिमंद मुलगी घराबाहेर पडते आणि थेट तिचा निर्वस्त्र मृतदेह आढळतो. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथे 17 वर्षीय गतिमंद मुलीचा मृतदेह नदीपात्रात निर्वस्त्र अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे घातपाताचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं?

गतिमंद मुलगी ही गुरुवारी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. सायंकाळपर्यंत ती परत न आल्यानं कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने तिचा शोध घेतला मात्र ती दिसली नाही. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही ती सापडली नसल्यानं शोध मोहीम थांबविण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी 21 फेब्रुवारी सकाळी साडेदहा वाजण्यास सुमारास एक स्थानिक व्यक्तीला नदीपात्रात मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. जवळ जाऊन पाहिल्यानंतर ती बेपत्ता असलेल्या मुलीचाच असल्याचं स्पष्ट झालं. मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळल्याने घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस ठाण्याचे पीएसआय राजेंद्र कपले यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासाबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नसली तरी मृतदेहाची अवस्था पाहता घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा येथे पाठविण्यात आला. पोलीस पुढील तपास सुरू आहे.
Maharashtra TimesChennai Beach Accident : चेन्नईतील बीचवर महाराष्ट्रातील मुलं वाहून गेली, तरुणीचा बुडून मृत्यू, तरुण बेपत्ता, मोठ्या लाटा उसळून अपघाताची शक्यता

लग्नाचं आमिष अन्…

स्त्रियांबाबत कितीही सरकारकडून सुरक्षिततेचे कायदे आणले तरी देखील त्यांच्या अडचणी किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. असाच काहीसा प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा