Headlines

Bangladesh Beat Australia 1st Test by 9 Wickets Bangladesh Win Historic Match; बांगलादेशचा कारनामा! ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं, ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब


Australia vs Bangladesh 1st Test : बांगलादेश क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करत इतिहास रचला आहे.

Australia vs Bangladesh 1st Test
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करत इतिहास रचला आहे. डार्विनच्या मरारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाचा तब्बल 9 विकेट्सने पराभव केला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामन्यात कांगारूंना पराभूत करण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. या विजयासह बांगलादेशनं क्रिकेटविश्वाला मोठा धक्का दिला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात बांगलादेशनं अवघ्या 57 धावांचं लक्ष्य एका विकेटच्या मोबदल्यात सहज गाठलं आणि ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला.

पहिल्या डावात बांगलादेशचा दबदबा

ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 198 धावांवरचगुंडाळला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच यजमान फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. त्यानंतर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात तब्बल 426 धावा उभारत ऑस्ट्रेलियावर 228 धावांची मोठी आघाडी घेतली. या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचं दडपण आलं. मात्र, बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली.

Maharashtra TimesIND vs SL Test Day 2 Time : पावसाने १७ षटके बुडवली त्याची भरपाई होणार! भारत-श्रीलंका कसोटीची वेळ बदलली; दुसऱ्या दिवशी सामना किती वाजता?

ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरला

चौथ्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने 4 बाद 161 धावांपासून केली. मात्र, बांगलादेशचा अष्टपैलू मेहदी हसन मिराजऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरला. मिराजने सर्वप्रथम अॅलेक्स कॅरीला 30 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर बेयू वेबस्टरला अवघ्या 5 धावांवर त्रिफळाचीत केले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सही केवळ 8 धावा करून मिराजच्या गोलंदाजीचा बळी ठरला.

ऑस्ट्रेलियाने 284 धावा केल्या

एका बाजूला ऑस्ट्रेलियाची विकेट्सची रांग लागली असताना कॅमेरॉन ग्रीननं एकाकी झुंज दिली. त्याने 201 चेंडूंचा सामना करत 4 चौकार आणि एका षटकारासह शानदार 104 धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. अखेर हसन महमूदनं ग्रीनला त्रिफळाचीत करत त्याची झुंज संपवली. त्यानंतर मिराजनं नॅथन लायनची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियानं 284 धावा केल्या आणि बांगलादेशसमोर विजयासाठी केवळ 57 धावांचं लक्ष्य ठेवलं.

Maharashtra TimesDevdutt Paddikal : देवदत्तचा सर्वात मोठा रेकॉर्ड! 150 वर्षांत कोणालाच जमलं नाही, ते पडिक्कलने करून दाखवलं; स्वातंत्र्यदिनी नेमकी कोणती कामगिरी?
इतिहास रचण्यासाठी बांगलादेशला फार मोठी मेहनत घ्यावी लागली नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडनं पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या तन्झीद हसनला खातेही न उघडता बाद करत बांगलादेशला सुरुवातीलाच धक्का दिला. मात्र त्यानंतर शादमान इस्लाम आणि मोमिनुल हक यांनी संयमी फलंदाजी करत संघाला आणखी कोणताही धक्का बसू दिला नाही. दोघांनी मिळून लक्ष्य गाठत बांगलादेशला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिला कसोटी विजय मिळवून दिला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा