Headlines

Badlapur Shirgaon Wife Killed Husband Front of Seven Year Old Son for Not Giving Saree; अपंगत्वामुळे नवरा अंथरुणावर, साडी न दिल्यानं बायकोचा राडा, चिमुकल्यासमोर बापालाच संपवलं; आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला


Badlapur Wife Killed Husband Over Saree Dispute : बदलापूरमध्ये साडीच्या वादातून पत्नीने अपंग पतीची प्रेशर कुकरने मारहाण करून गळा घोटल्याचा आरोप आहे. सात वर्षांच्या मुलाच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Badlapur Wife Killed Husband Over Saree Dispute
शिरगाव साडीमुळे पत्नीने पतीची हत्या केली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बदलापूर : क्षुल्लक वादातून पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे. पतीनं साडी घेऊन दिली नाही या कारणावरून संतापलेल्या पत्नीने आधी पतीच्या डोक्यात प्रेशर कुकर मारला आणि त्यानंतर गळा घोटून त्याला जिवे मारलं. यावेळी त्यांचा सात वर्षांचा चिमुकला देखील घरातच होता. त्याच्यासमोर आईने वडिलांना मारल्याचं त्याने पाहिलं. पोलिसांना घटना समजताच बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तिला तत्काळ ताब्यात घेतलं आहे. हरेराम सिंग असं मृत्यू झालेल्या पतीचं नाव असून आरोपी पत्नीचं नाव सुनीता देवी आहे.

नेमकी घटना काय?

19 जुलै रविवारी रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बदलापुरमधील शिरगावात राहणाऱ्या हरेराम सिंग आणि सुनीता देवी यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. या वादाची सुरुवात पतीने साडी न दिल्यावरून झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर सुनीता देवीने हरेराम सिंग याच्या डोक्यात कुकर मारला आणि गळा घोटून हत्या केली, असं तपासात समोर आलं आहे. हरेराम हा अपंग असल्यामुळे तो अंथरुणावरच होता. या दोघांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाल्याचं सांगितलं जात असून सुरुवातीला आरोपी महिलेनं पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सात वर्षांच्या मुलाचा जबाब घेतल्यानंतर खरा प्रकार समोर आला.
Maharashtra TimesCrime News : रिक्षातून जाताना उचललं, जबरदस्ती गुड्डू भैय्याच्या थारमध्ये डांबलं, वाळूचं कमिशन न दिल्यानं संतापनजक प्रकार; नेमकं काय घडलं?

हत्या साडीच्या कारणावरुनच की…

या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी सुनीता देवीला अटक केली. आता ही हत्या साडीच्या कारणावरूनच होती की, त्यामध्ये इतरही कोणती कारणं आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. तसंच हरेरामच्या हत्येमध्ये इतर कोणाचाही सहभाग आहे का? त्यावेळी घटनास्थळी कुणी उपस्थित होतं का? याचीही सखोल चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.

महिलेनं प्रियकराला संपवलं

कल्याणमधील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूममध्ये लपवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने मृतदेह लवकर कुजावा व रक्तासह इतर महत्त्वाचे पुरावे नष्ट व्हावे म्हणून बाथरूमचा नळ सलग सुरू ठेवला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
Maharashtra TimesNavi Mumbai News : ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून फ्लॅट क्रमांक १०४ मधून पाणी बाहेर येत असल्याची तक्रार इमारतीतील रहिवाशांनी घरमालक अजय पाटील यांच्याकडे केली होती. यानंतर पाटील यांनी भाडेकरूंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संशय अधिक वाढला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा