राज्यात 2 हजार शाळा बंद, पेपरफुटी सुरूच:शिक्षण व्यवस्थेवरून संजय राऊतांचा मोदी-शहांसह राज्य सरकारवर हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली असून, राज्यात बोगस डिग्रीचा मोठा स्कॅम सुरू आहे,” असा आरोप राऊत यांनी केला आहे. पेपरफुटी, नवीन शाळांच्या मंजुरीतील भ्रष्टाचार आणि शिक्षकांना लावली जाणारी अवांतर कामे यावरून त्यांनी राज्य…
