Headlines

Argentina player Leandro Paredes punches Spain star Eric Garcia in the face after FIFA World Cup final loss; विजेतेपदाचे स्वप्न भंगताच अर्जेंटिनाचा पारेडेस आक्रमक, स्पॅनिश खेळाडूंना मैदानातच भिडला, व्हिडिओ समोर


Argentina player punches Spain star in the face : विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत असलेल्या स्पेनच्या एरिक गार्सियावर अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिएंड्रो पारेडेस धावून गेला. पारेडेसने त्याला दोन वेळा ठोसा मारला आणि वाद वाढत गेला.

FIFA World Cup Winner 2026 Spain vs Argentina Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वॉशिंग्टन : फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत केवळ दोन संघ एकमेकांना भिडत असले, तरी जगभरातील चाहतेही दोन टीम्समध्ये विभागले होते. १६ वर्षांचा दुष्काळ संपवत स्पेनने वर्ल्डकप उंचावला, मात्र त्यानंतर गतविजेत्या अर्जेंटिनाच्या गोटातील वातावरण चांगलेच तापले. अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिएंड्रो पारेडेस याची काही स्पॅनिश खेळाडूंसोबत जोरदार वादावादी झाली. अंतिम शिट्टी वाजल्यानंतर लगेचच पारेडेस स्पेनचा डिफेन्डर एरिक गार्सिया याला सामोरा जाताना कॅमेऱ्यात दिसला. विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत असलेल्या गार्सियावर पारेडेस धावून गेला. पारेडेसने त्याला दोनदा ठोसा मारला आणि वाद वाढत गेला. अखेर गार्सियाचा सहकारी गावीने मध्ये पडला. त्याने दोघांना वेगळे करण्याचा आणि आपल्या बार्सिलोना टीममेटसमोर उद्भवलेला तणाव निवळण्याचा प्रयत्न केला.

चिडलेल्या पारेडेसने गावीच्या दिशेने हात उचलला, पण अर्जेंटिनाच्या थियागो अल्माडाने हस्तक्षेप करत गावीला खाली ढकललं, जेणेकरुन तो पारेडेसचा फटका चुकवू शकेल. मात्र अल्माडाच्या प्रयत्नांनंतरही तणाव वाढतच गेल्याने पारेडेसने गावीच्या चेहऱ्यावर मुक्का मारलाच.

अर्जेंटिनाच्या मॅनेजरने खेळाडूंना पांगवलं

विश्वचषक विजेतेपद राखण्याच्या प्रयत्नांचा निराशाजनक शेवट झाल्यानंतर काही क्षणांतच ही घटना घडली. अखेरीस अर्जेंटिनाचे मॅनेजर लिओनेल स्कालोनी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी आपल्या खेळाडूंना एका अत्यंत गंभीर परिस्थितीतून बाहेर काढले. ही घटना घडल्यानंतर पारेडेसला रेड कार्ड दाखवण्यात आले.
Maharashtra TimesIND vs ENG 3rd ODI : इंग्लंडच्या 388 धावांचा पाठलाग करताना भारताचा 27 धावांनी पराभव, रोहित-विराटची झुंजार खेळी व्यर्थ, अवघ्या 3 चेंडूत फिरला सामना

स्पेन दुसऱ्यांदा जगज्जेता

सामन्याच्या १०६ व्या मिनिटाला बदली खेळाडू फेरान टोरेसने ‘रिबाउंड’वर सर्वात जलद प्रतिसाद देत एकमेव गोल केला आणि स्पेनला अतिरिक्त वेळेत १-० असा विजय मिळवून देत त्यांचे दुसरे फिफा विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले.

आंद्रेस इनिएस्टाने नेदरलँड्सविरुद्ध अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करुन स्पेनला त्यांचे पहिले विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले होते; त्यानंतर बरोबर १६ वर्षे आणि आठ दिवसांनी हा गोल झाला.

संपूर्ण सामन्यावर स्पेनचे वर्चस्व

संपूर्ण अंतिम सामन्यात स्पेनचे वर्चस्व राहिले. त्यांनी २० शॉट्स मारले, तर अर्जेंटिनाला अतिरिक्त वेळेच्या अंतिम टप्प्यापर्यंत एकही शॉट मारता आला नाही. तसेच निर्धारित वेळेच्या समाप्तीपूर्वीच अर्जेंटिनाचे खेळाडूंचे बळ कमी झाले; पाऊ कुबारसीवर उशिरा टॅकल केल्यामुळे एन्झो फर्नांडिसला दुसरे पिवळे कार्ड (आणि परिणामी रेड कार्ड) मिळाले.

अर्जेंटिना-स्पेन संघातील राड्याचा व्हिडिओ

लुईस दे ला फुएन्ते यांच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत केवळ एकच गोल मारुन विश्वविजेते बनण्याचा इतिहासही रचला. सलग स्पर्धांमध्ये ‘युईएफए युरोपियन चॅम्पियनशिप’ आणि ‘फिफा विश्वचषक’ जिंकणारा स्पेन हा एकमेव देश आहे; त्यांनी ही कामगिरी आता दोनदा करुन दाखवली आहे.
Maharashtra TimesRohit Sharma : नाद करता काय! रोहित शर्माचे तुफानी शतक, लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर पठ्ठ्याने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

मेस्सीचा स्वप्नभंग

लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिनाने २०२१ आणि २०२४ ची ‘कोपा अमेरिका’ तसेच २०२२ चा ‘फिफा विश्वचषक’ जिंकला होता. या पराभवामुळे त्यांच्या त्या शानदार प्रवासाचा अंत झाला. मेस्सीने या स्पर्धेत आठ गोल आणि चार असिस्टची नोंद केली, परंतु फुटबॉलमधील सर्वात मोठा किताब पुन्हा जिंकण्यात स्पेनने आपली पकड मजबूत राखल्यामुळे मेस्सीला आपल्या संघाला पुन्हा विजयाच्या मार्गावर आणता आले नाही.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा