Apara Mehta On Her Husband : टीव्ही अभिनेत्री अपारा मेहता यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पती दर्शन जरीवाला यांच्यापासून वेगळं राहण्याचं कारण सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ आणि ‘जमाई राजा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अपारा मेहता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते दर्शन जरीवाला यांच्यासोबतच्या त्यांच्या लग्नाबद्दल भाष्य केलंय. अभिनेत्रीनं सांगितलं की, ती आणि तिचा पती २० वर्षांपासून वेगळे राहत आहेत.
मुलाखतीदरम्यान अपारा मेहता यांनी सांगितलं की, त्या अमेरिकेत असताना दर्शन जरीवाला यांनी त्यांना फोन केला होता. अभिनेत्रीला याची कल्पनाही केली नव्हती. दर्शन यांनी फोनवर सांगितलं की त्यांना बोलायचं आहे. दर्शन जरीवाला यांना त्यांच्याशी नक्की कशाबद्दल बोलायचं आहे. त्या दिवशी अपारा मेहता आणि दर्शन जरीवाला यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. अपारा म्हणाल्या की, ‘मी माझ्या शो नंतर अमेरिकेतून परत आले. मी पहाटे ३ वाजता उतरले, पहाटे ५ वाजता घरी पोहोचले आणि माझी शिफ्ट सकाळी ७ वाजता होती. दर्शन सहज म्हणाला, ‘बघ अपारा, आपण वेगळं व्हायला पाहिजे. कारण, माझं तुझ्यावर आता प्रेम नाही. तू मला आता आवडत नाहीस आणि तू माझ्या आयुष्यातली सर्वात कुरूप स्त्री आहेस.’ Shagufta Ali : 26 वर्षाचं रिलेशनशिप, बॉयफ्रेंडचं अकाली निधन; सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग, म्हणाली, ‘मी खूप रडायचे’ अपारा पुढे म्हणाल्या की, ‘दर्शन सकाळी चहाचा कप घेऊन झोपाळ्यावर बसला होता आणि मी माझ्या शूटिंगसाठी निघाले होते. त्या दिवशी मला तीन मोठे सीन शूट करायचे होते. मी पहाटे ५ वाजताच अमेरिकेतून परत आले होते, त्यामुळे दोन टेक्सच्या मध्ये मला डुलकी लागली. नंतर दुपारी, जेव्हा मला पूर्ण शुद्ध आली, तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘दर्शन आता काय म्हणाला? त्याचा तसा अर्थ नसावा.’
‘एक दिवस तो घर सोडून गेला. ते अजूनही आमचंच घर आहे, पण त्याने घर सोडलंय. त्याच्यासाठी घराची दारं नेहमीच उघडी आहेत. तो परत येऊ शकतो. पण मला हेही माहीत आहे की, तो कदाचित परत येणार नाही. त्याला माझ्यासारखं कोणी मिळणार नाही आणि मला त्याच्यासारखं कोणी मिळणार नाही. आणि हो, जरी आम्ही वेगळे राहत असलो तरी, आम्ही एकमेकांचा आदर करतो. आम्ही अजूनही एकमेकांच्या इच्छा पूर्ण करू शकतो.’ असंही अपारा यांनी पुढे सांगितलं. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अपारा मेहता बोलत होत्या. Rajesh Khanna : दत्तक घेतल्याचं समजताच बसला धक्का, सख्ख्या बहिणीनंही केलं परकं, लोकांवरचा विश्वास उडाला; राजेश खन्ना यांच्याबद्दल एक्स गर्लफ्रेंडचा दावा दरम्यान, अपारा मेहता आणि दर्शन जरीवाला यांनी १९८० मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर १९८१ मध्ये, त्यांनी कुटुंबाच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. त्यांना खुशाली नावाची एक मुलगी आहे. दर्शन जरीवाला आणि अपारा २००३-२००४ मध्ये वेगळे झाले. त्यांचा घटस्फोट झालेला नाही, पण ते अजूनही वेगळे राहतात आणि एकमेकांना आधार देतात.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा