Amaal Mallik : सुप्रसिद्ध गायक अमाल मलिकनं केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

अमाल मलिकची पोस्ट
अमाल मलिकनं ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘केतनला जीवे मारण्यासाठी एवढी मेहनत घेण्याची काहीच गरज नव्हती, फक्त एकदा नाही म्हणाली असती तरी पुरे झालं असतं. दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीवर प्रेम आहे, हे सांगितलं पाहिजं होतं. हे सांगून पण त्यानं ऐकलं नाही आणि तो मागेच लागला असता तर त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल सांगायचं होतं. कुटुंबाला यामध्ये विश्वासात घेतलं पाहिजं होतं. या जगात कुठेही एका स्वतंत्र, सुशिक्षित आणि कमावणाऱ्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध आणि तिच्या इच्छेविरुद्ध जाण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही.’
Smita Tambe : सिनेमा, मातृभाषेवरचं प्रेम ते लेकीला दिलेली शिकवण, स्मिता तांबेसोबत खास गप्पा
‘भारतातील कायदे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी चांगले आहेत, पण व्यवस्थेचा गैरवापर आणि हेराफेरी का करायची? फक्त एक भित्रा माणूसच दुसऱ्या माणसाविरुद्ध असा कट रचू शकतो. कोणाचं तरी मूल हिरावल्यानंतर आपण सुखी आयुष्य जगू शकतो, असा विचार करण्याची या दोघांची हिंमतच कशी झाली? एक जीव गेला, कुटुंब उद्ध्वस्त झाली. राक्षस.’ असं अमालनं म्हटलंय.
आणखी एक पोस्ट शेअर करत अमालनं लिहिलं की, ‘वर्षानुवर्षे महिलांवर पुरुषांमुळे खूप अत्याचार झाले आहेत आणि त्यांनी खूप सहन केलंय. त्यासाठी मी सर्व महिलांची माफी मागतो. पुरुषप्रधान विचारधारेला विरोध करणाऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. अत्याचाराविरोधात लढा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे, पण हा लढा फक्त नीच लोकांसाठी मर्यादित ठेवा. जे लोक स्त्रियांना त्रास देतात, त्यांचा छळ करतात आणि त्यांना एखाद्या जनावराप्रमाणे वागवतात, अशा लोकांविरोधात आवाज उठवला पाहिजे. स्त्रियांनी काय कपडे घालावेत हे सांगणारे लोकही तितकेच घातक असतात. पण, प्रत्येक गोष्टीला ‘टॉक्सिक’ असं नाव दिल्यामुळेच आपण खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होतं. नात्यामध्ये कोणत्याही बाजूनं होणारी शारीरिक हिंसा ही टॉक्सिक असते. भावनांपेक्षा पैशांना अधिक महत्त्व देणंही टॉक्सिक आहे. सोशल मीडियावर दाखवण्यासाठी लग्न करणं टॉक्सिक आहे. तसंच ज्याच्यासह आयुष्यभर राहण्याचा कोणताही हेतू नाही, अशा व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करणे हे देखील तितकंच टॉक्सिक आहे.’
Girija Oak : ‘आता आम्ही फार संपर्कात नाही, त्यांचंही कुटुंब आहे’, वडील गिरीश ओक यांच्याबद्दल गिरिजा ओकचं वक्तव्य
‘तुम्हाला वाटते का पुरुषांना शांततेशिवाय दुसरं काही हवं असतं? शारीरिक संबंध तर सगळीकडे उपलब्ध आहेत. पण, तुमच्या गरजा आणि इच्छांची मोठी यादी असते, विशेषतः जेव्हा लग्नाचा विषय येतो तेव्हा खूप अपेक्षा ठेवल्या जातात. इन्स्टाग्रामवर दिखावा करण्यासाठी लग्न पाहिजे असतं की, खरं प्रेम असलेलं लग्न पाहिजे? तुम्ही लोणावळ्यातील एका सुंदर हनिमूनमध्येही आनंदी राहू शकता, पण तुम्हाला खरं प्रेम असेल तर तो परदेशामध्ये घेऊन जाईल असं वाटतं. आपल्या सर्वांना उत्तम आयुष्य पाहिजे असतं हे समजू शकतो, पण फक्त मालदीवमध्ये खऱ्या प्रेमाची भावना वेगळी असते का? या माणसाबरोबर जे झालं आहे, ते नव्हतं व्हायला पाहिजे. त्याचं हसणं आणि त्याचे डोळे बघा… तिच्याशी लग्न करण्यासाठी तो किती आनंदी होता ते बघा. केतन अग्रवाल खूप निर्मळ मनाचा आणि गोड वाटत होता.’ असं अमालनं शेवटी म्हटलं आहे.

