Headlines

Alandi News | इंद्रायणीला महापूर, आळंदीचे सर्व रस्ते बंद; वारकऱ्यांना देहू-आळंदीत न येण्याचं कळकळीचं आवाहन


पिंपरी -पिंपरी-मावळ व पिंपरी चिंचवड परिसरातील अतिवृष्टीमुळे देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे आळंदीला जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. वारकऱ्यांनीनी देहू- आळंदीत येऊ नये, स्वतःची काळजी घ्यावी. पुणे, पिंपरी-चिंचवडमधून पालखीत सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्री संत तुकाराम महाराज संस्थान कमिटीने तसेच प्रशासनाने केले आहे.दरम्यान, आणखी ४८ तास पावसाचा धडाका कायम राहण्याचा अंदाज असल्याने पालखी प्रस्थान सोहळ्यावर पावसाचे सावट आहे.

आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्यापालखीचे मंगळवारी, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. दोन दिवसांपासून पुणे जिल्हा आणि विशेषतः मावळ, देहू व आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदीची दोन्ही पात्रे दुथडी बाहत असून आळंदी व देहू परिसरातील महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत.
इंद्रायणी नदीची वाढती पातळी आणि धुवाधार पाऊस पाहता बारकऱ्यांनी देहू आणि आळंदी येथे गर्दी न करता थेट पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकाहद्दीतून किंवा त्यापुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, दोन्ही देवस्थान संस्थानने केले आहे.

तुकोबांच्या पालखीचे७ जुलैला देहूतून प्रस्थान झाल्यानंतर त्या दिवशी पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी आहे. ८ जुलैला माउलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

तुकोबाचे पालकी प्रस्थान

आज दुपारी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा यंदा ३४१ वा पालखी सोहळाअसून प्रस्थान सोहळ्याची सुरुवात मंगळवारी पहाटेपासूनच होणार आहे. पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा होईल. इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन आणि दुपारी इनामदारवाड्यातून महाराजांच्या पावुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात येतील. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ होईल. सायंकाळी पाचलापालखी प्रदक्षिणा होईल आणि पालखी इनामदार वाड्याकडे मार्गस्थ होईल. रात्री इनामदारवाड्यातच पालखी सोहळ्याचा मुक्काम असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी दिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत