AI Startup: लहानपणी आई वडिलांना त्यांच्या कामात मदत करताना अपूर्वला कायम एक अडचण यायची. भविष्यात त्यानं हीच समस्या सोडवली आणि याच आधारावर कंपनी उभारली. आज तिचं बाजार भांडवल ८३०० कोटींच्या घरात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: आपल्यातील अनेक जण मिस्ड कॉल पाहिल्यावर एक तर त्याच नंबरवर पुन्हा कॉल करतात किंवा मग त्याकडे दुर्लक्ष करतात. पण भारतीय वंशाच्या एका इंजिनीअरनं यात व्यवसायाची संधी पाहिली. मिस्ड कॉलवरुन त्याला व्यवसायाची संकल्पना सुचली. त्यातून त्यानं एक कंपनी सुरू केली. आता तो अब्जावधीचा मालक आहे.
अमेरिकेतील MIT मधून शिक्षण पूर्ण केलेल्या अपूर्व श्रीवास्तवनं मिस्ड कॉलची समस्या सोडवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला. अपूर्वनं Avoca नावाची कंपनी स्थापन केली. आजच्या घडीला तिचं बाजारमूल्य ८३०० कोटी रुपयांच्या घरात आहे. अपूर्वचं बालपण अमेरिकेच्या मिशिगनमध्ये गेलं आहे. तिथे त्याच्या आई, वडिलांचा लहानसा व्यवसाय होता. शाळेच्या दिवसांमध्ये अपूर्व दुकानात ग्राहकांचे कॉल उचलण्यास मदत करायचा. ISRO Crisis: इस्रोसमोर संकट! राजीनाम्यांच्या सपाट्यानं मिशन गगनयान धोक्यात; सरकारची पळापळ, नेमकं प्रकरण काय? आई, वडिलांना मदत करत असताना एक गोष्ट अपूर्वच्या लक्षात आली. जेव्हा जेव्हा एखाद्या ग्राहकाचा कॉल मिस व्हायचा, तेव्हा तेव्हा अपूर्व पुन्हा कॉल करण्याऐवजी एखाद्या दुसऱ्या दुकानाशी संपर्क साधायचा. म्हणजेच एका मिस्ड कॉलमुळे व्यवसायाचं थेट नुकसान व्हायचं. पण हाच प्रयोग अपूर्वची सर्वात मोठी ताकद ठरला.
पुढे अपूर्वनं अमेरिकेच्या मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास केला. २०२२ मध्ये त्यानं त्याचा साथीदार टायसन चेन सोबत Avoca नावानं एक AI स्टार्टअप सुरू केला. विशेष म्हणजे टायसननंदेखील लहानपणी त्याच्या आईच्या क्लिनिकमध्ये तीच समस्या पाहिली होती. त्यामुळे दोघांनी एक खूणगाठ मनात बांधली. असं तंत्रज्ञान विकसित करायचं की ग्राहकाचा एकही मिस होणार नाही, असा निर्धार दोघांनी केला. Noida Fire: बरं वाटत नाही! आज सुट्टी घेते! बॉसशी खोटं बोलून घरी थांबली; अचानक मारलेली दांडी जीवावर बेतली सुरुवातीला दोघांनी रेस्टॉरंटसाठी AI कॉल रिसेप्शन सिस्टिम तयार केली. होम सर्व्हिस क्षेत्रात या यंत्रणेची गरज अधिक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. एखाद्या रेस्टॉरंटचा कॉल मिस झाल्यास काही डॉलरची ऑर्डर हातून जाऊ शकते. पण जर AC, HVAC, प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिकल सेवा देणाऱ्या कंपनीचा कॉल मिस झाल्यास हजारो डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं, ही बाब दोघांच्या लक्षात आली. मग Avoca नं याच क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं.
Avoca चा व्हॉईस एजंट एखाद्या माणसाप्रमाणे ग्राहकांशी बोलतो. कंपनीचा कर्मचारी कॉल न उचलू शकल्यास AI लगेच तो कॉल घेतो. ग्राहकाची गरज समजून घेतो. अपॉईंटमेंट बुक करतो. कंपनीचं कॅलेंडर पाहतो आणि गरज पडल्यास जुन्या कोटेशनवर फॉलोअपही घेतो. यामुळे लहान व्यावसायिकांचा एकही कॉल मिस होत नाही. त्यामुळे त्यांचं संभाव्य नुकसान टळतं. कंपनीला गुंतवणूकदारांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे. Avoca ला आतापर्यंत 125 मिलियन डॉलरपेक्षा अधिकचं फंडिंग मिळालं आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा