Headlines

Affordable Rental Housing Scheme; घर खरेदी परवडत नाही? अतिशय कमी भाड्यात मिळणार घर; सरकारच्या ARHS योजनेमुळे Home Buyers ची चंगळ, जाणून घ्या पात्रता निकष


Housing Scheme: आपल्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्र गेल्या काही वर्षांत भरभराटीला आलं आहे, पण आजही लाखो भारतीयांना घर खरेदी करणं कठीण झालं आहे. मजूर, कारखान्यातील कामगार, विद्यार्थी आणि कमी उत्पन्न असलेली कुटुंबे कामाच्या शोधात एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर होतात. अशा लोकांसाठी स्वतःच घर घेण्यापेक्षा सुरक्षित आणि परवडणारे घर भाड्याने घेणे अनेकदा अधिक फायदेशीर ठरते.

लाखो लोकांच्या या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने ‘परवडणारे भाडेतत्त्वावरील गृहसंकुल’ – Affordable Rental Housing Complex – ARHC योजना सुरू केली, जी लोकांना स्वस्त आणि चांगली भाड्याची घरे उपलब्ध करून देते. नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे काही काळ किंवा दीर्घ काळासाठी भाड्याने घर शोधात आहेत, अशा लोकांसाठी ही योजना कामाची आहे.
Maharashtra TimesAdani Airlines: विमानतळ व्यवस्थापनानंतर आता थेट एअरलाइन्समध्ये अदानींची उडी! इंडिगो, एअर इंडियाची मक्तेदारी संपवणार?
MoHUA च्या माहितीनुसार या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो, कशी काम करते, त्याअंतर्गत कोणत्या प्रकारची घरे उपलब्ध आहेत, पात्रता काय, फायदे काय आणि अर्ज करण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? समजून घेऊया.

Affordable Rental Housing योजना काय आहे?

सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या भाड्याच्या गृहनिर्माण योजनेचा उद्देश शहरी भागांमध्ये परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देण्याचा आहे. तसेच नोकरीतील अडचणी, आर्थिक अडचणी किंवा तात्पुरत्या घराच्या गरजेमुळे घर खरेदी करू न शकणाऱ्यांना परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा फायदा मिळू शकतो.

आपल्या देशात लाखो लोक रोजगार, शिक्षण किंवा कामाच्या उद्देशाने कारखान्यातील कामगार, घरगुती कामगार, रस्त्यावरील विक्रेते, सेवा क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी आणि कमी उत्पन्न असलेली कुटुंबे एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतर करत असतात. अशा परिस्थितीत, लोकांना भाड्याच्या घरासाठी संघर्ष करावा लागतो आणि याच समस्येचे निराकरण म्हणून या लोकांना उत्तम घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
Maharashtra TimesPakistan Cash Crunch Crisis: इराणसोबत चर्चा घडवून दिली आता 96000 कोटी द्या! पाकिस्तानने अमेरिकेसमोर पुन्हा हात पसरवले

कोण अर्ज करू शकतं?

शहरी स्थलांतरित कामगार, कारखान्यातील कामगार, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि कमी उत्पन्न असलेली कुटुंबे, आपल्या मूळ गावापासून दूर काम करणारे कर्मचारी आणि इतर गरजू शहरी रहिवाशांसाठी प्रामुख्याने ही योजना सुरू केली आहे. पण या योजनेतील पात्रता सरकारी नियमांनुसार ठरवले जाते.

या योजनेअंतर्गत गरजेनुसार एक-खोली, डॉर्मिटरीज, फॅमिली अपार्टमेंट्स आणि बहु-खोली युनिट्स अशी विविध प्रकारची भाड्याची घरे पुरवली जातात. पण घराचा आकार आणि सुविधा प्रत्येक प्रकल्पानुसार बदलू शकतात.
Maharashtra TimesIncome Tax Notice Fraud: आयकर विभागाच्या नावाने आलेली नोटीस खोटी आहे की खरी? जाणून घेण्याची पद्धत अतिशय सोपी

कशी काम करते ही योजना?

  • या योजनेअंतर्गत सरकार 3 प्रकारे परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देते.
  • पहिले रिकामी सरकारी घरे भाड्याच्या घरांमध्ये रूपांतरित केली जातात.
  • दुसरे सरकार आणि खाजगी विकासक संयुक्तपणे नवीन प्रकल्प विकसित (पीपीपी मॉडेल) करतात.
  • तिसरे खाजगी विकासक सरकारी नियमांनुसार नवीन भाड्याच्या घरांचे प्रकल्प विकसित करतात.

भाडेकरूंना कोण-कोणते फायदे मिळतात?
या योजनेअंतर्गत लोकांना परवडणाऱ्या भाडे दरात दर्जेदार आणि सुरक्षित घरे मिळू शकतात. यामध्ये कामाच्या ठिकाणाजवळ राहण्याची सोय, स्वच्छ परिसर, आवश्यक मूलभूत सुविधा आणि उत्तम राहणीमानाचा लाभही मिळू शकतो पण, प्रत्येक प्रकल्पानुसार वेगवेगळ्या सुविधा असू शकतात.

कोणीही अर्ज करू शकतो का?
एखाद्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत भाड्याच्या घरासाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम पात्रता तपासली पाहिजे. अर्ज करण्यापूर्वी उत्पन्न, रोजगार, घराची गरज आणि प्रकल्पाच्या पात्रतेच्या आवश्यकता पूर्ण करता याची खात्री करा. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत नियम वाचा.

तसेच पात्रता, मासिक भाडे, सुरक्षा ठेव (असल्यास), भाडे करार, राहण्याचा कालावधी, देखभालीची जबाबदारी, उपलब्ध सुविधा, स्थान, वाहतूक सुविधा आणि घर खाली करण्यासंबंधी किंवा भाडेवाढीसंबंधी नियम अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या.

भाडे नंतर वाढू शकते का?
या योजनेअंतर्गत भाडेवाढ नंतर होऊ शकते, जे प्रकल्पाच्या अटी व शर्ती आणि भाडे करारावर अवलंबून असेल. म्हणून करारावर सही करण्यापूर्वी भाडेवाढीचे नियम, देखभाल शुल्क, वीज आणि पाण्याच्या बिलांची जबाबदारी, आणि घर खाली करण्याच्या अटी काळजीपूर्वक तपासा.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत