Bollywood Actor Suresh : ५० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश यांच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया.

१९३० मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली
हा अभिनेता म्हणजे ५० च्या दशकातील प्रसिद्ध स्टार सुरेश असून त्यांचं खरं नाव नाझिम अहमद होतं. त्यांचा जन्म १९२८ मध्ये पंजाबमधील गुरदासपूर येथे झाला. सुरेश यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये काम केलं असलं तरी ए. आर. करदार दिग्दर्शित ‘ठोकर’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. सुरेश यांनी बालकलाकार म्हणून बॉम्बे टॉकीजसाठी ‘बंधन’, ‘अंजन’, ‘नया संसार’ आणि ‘बसंत’ या चार चित्रपटांमध्ये काम केलं.
Shantanu Moghe : प्रिया मराठेचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न, पहिल्यांदाच बोलला शंतनू मोघे; म्हणाला, ‘मी नक्की पूर्ण करणार’
चित्रपट इतिहासकार शिशिर कृष्ण शर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, सुरेश यांनी सर्वप्रथम १९४६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सोना चांदी’ या चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांनी सुरैयासोबत ‘रंग महल’मध्ये काम केलं, पण दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरले. त्यानंतर त्यांनी ए. आर. करदार दिग्दर्शित आणि गीता बाली अभिनीत ‘दुलारी’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला.
Sunanda Sharma : ब्रेकअपमुळे मिळाला धडा, अध्यात्म्याकडे वळली अन् बदललं आयुष्य; 9 मुलांना घेतलं दत्तक, लोकप्रिय गायिकेनं सांगितला प्रसंग
त्यानंतर त्यांनी ‘दास्तां’, ‘जादू’, ‘दीवाना’ आणि ‘यास्मिन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, १९५० मध्ये ते पाकिस्तानला गेले, जिथे त्यांनी ‘दो किनारे’ आणि ‘ईद’ हे चित्रपट बनवले, पण नंतर ते भारतात परतले. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी मधुबाला, सुरैया, नलिनी जयवंत आणि पद्मिनी यांसारख्या अनेक आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केलं.
Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली
१९५७ मध्ये, सुरेश यांनी ‘कॅप्टन किशोर’ या चित्रपटात किशोर कुमार यांच्यासोबत काम केलं. मात्र, १९६० च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली आणि त्यांनी सहाय्यक व चरित्र भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. सुरेश यांनी ‘आप की परछाईयां’, ‘मजबूर’, ‘ये रात फिर ना आयेगी’, ‘रेशम की डोरी’, ‘सेवक’ आणि ‘अदालत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. मात्र, नंतर त्यांनी निर्माता बनण्याचा निर्णय घेतला आणि शशी कपूर, रीना रॉय आणि अन्वर हुसेन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘गंगा और सूरज’ हा चित्रपट बनवला. चित्रपटाचा बराचसा भाग चित्रित झाल्यानंतर अभिनेते अन्वर हुसेन आजारी पडले. यामुळे तो चित्रपट बंद पडला आणि कादर खान यांना सिनेमात घ्यावं लागलं. त्या अभिनेत्यानं आपल्या चित्रपट कारकिर्दीतील सर्व कमाई त्या चित्रपटात गुंतवली आणि नंतर तो कंगाल झाला.
Aamir Khan : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला आता मुस्लीम समाजाचा विरोध, अभिनेत्याविरोधात फतवा जारी
पत्नीनं केला विश्वासघात
‘गंगा और सूरज’च्या सिनेमाच्या अपयशाने सुरेश आधीच खचले होते पण, त्याचबरोबर अभिनेता आपल्या पत्नीचा विश्वासघातही सहन करू शकला नाही. अभिनेत्री शम्मीने एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की, तिचा पती सुलतान अहमदचं अभिनेता सुरेश यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. सुलतान अहमद ‘गंगा और सूरज’चं दिग्दर्शन करणार होता आणि या संदर्भात तो सुरेश यांना वारंवार भेटायचा, अनेकदा अभिनेत्याच्या घरी जायचा. यामुळे सुरेश यांची पत्नी सुलतान अहमदच्या अधिक जवळ आली आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी तिनं पतीचं घर सोडलं. आपला चित्रपट ‘गंगा और सूरज’ अपूर्ण राहिल्याने दुःखी असलेले सुरेश अहमद, पत्नीच्या विश्वासघातामुळे इतके खचले होते की, ते स्वतःला सावरू शकले नाहीत आणि १४ जुलै १९७९ रोजी, वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

