Headlines

जीवघेणा खड्डा बुजवून विलास बांदेकर यांची समाजोपयोगी सेवा


कट्टा/वार्ताहर : मालवण कसाल हमरस्त्यावर गुरामवाड येथे रस्त्यावर पडलेला जीवघेणा खड्डा अनेक दिवस वाहनचालकांसाठी अपघाताचे कारण ठरत होता. बरेच वाहन चालक त्याठिकाणी अपघात होऊन पडले. याची माणुसकीच्या दृष्टीने दखल घेत प्रशासनाची वाट न पाहता वरची गुरामवाडी ग्रामपंचायत तथा सेवास्पर्श फाउंडेशनचे सदस्य विलास बांदेकर यांनी शानू डिसोझा आणि योगेश कामतेकर यांच्या मोलाच्या सहकार्याने हा खड्डा भरून सिमेंट काँक्रिट टाकून बुजवला. जेणेकरून त्याठिकाणी होणारे अपघात टळले जातील.
ही केवळ खड्डा बुजवण्याची कृती नव्हती तर अनेक निष्पाप जीवांचे रक्षण करण्याचा एक निःस्वार्थ प्रयत्न होता.

आज अनेकजण समस्यांकडे बोट दाखवतात पण काही समस्या आपणही सोडवू शकतो हे वेळीच समजल्यास समाजातील अनेक समस्या सोडवणे सोपे होईल. मालवण कसाल रस्त्यावरील जीवघेणा खड्डा बुजविल्याने वाहनचालकांमधून व आजुबाजूच्या लोकांमधून विलास बांदेकर, शानू डिसोजा, योगेश कामतेकर व सेवास्पर्श फाउंडेशनचे कौतुक केले जात आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत