दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला रविवारी 20 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांची प्रकृती ढासळत असल्याने आता राज्याच्या राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी आज (शुक्रवारी) पत्
.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर पक्षाची भूमिका
सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले, “सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे. उच्च न्यायालयानेही सरकारला काही सूचना दिल्या आहेत. या आंदोलनातून लवकरात लवकर काहीतरी सकारात्मक तोडगा निघाला पाहिजे, हीच आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे. केंद्राने यात हस्तक्षेप करून हे उपोषण थांबवावे, कारण त्यांची प्रकृती खराब होणे योग्य नाही.”
उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ आंदोलनाला टोला
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीपेटीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात उद्धव ठाकरे आज नागपुरात ‘रामरक्षा पठण’ आंदोलन करणार आहेत. यावर शिरसाट यांनी खोचक टीका केली. “उद्धव ठाकरेंना आता रामाची आणि हनुमानाची आठवण झाली आहे, ते भक्ती रसात लीन होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, नवनीत राणांनी जेव्हा हनुमान चालिसा वाचण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा त्यांना तुरुंगात टाकले होते. हे सरकार त्यांच्या आरतीला अडवणार नाही, त्यांनी अत्यंत भक्तिभावाने आरती करावी,” असा चिमटा त्यांनी काढला. तसेच, हे आंदोलन म्हणजे केवळ संजय राऊत यांचे फुकटचे सल्ले असल्याचा दावाही त्यांनी केला.
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर सावध प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यात झालेल्या बैठकीबाबत शिरसाट म्हणाले की, जोपर्यंत उपमुख्यमंत्री किंवा जयंत पाटील स्वतः अधिकृत माहिती देत नाहीत, तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये. मात्र, “पुढील आठ दिवसांत या चर्चांचा सारांश बाहेर येईल. मी केलेली भाकिते नेहमीच खरी ठरतात, त्यामुळे एक आठवडा वाट पाहा,” असा राजकीय सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला.
मराठवाड्यातील संभाव्य दुष्काळावर चिंता
ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा उलटूनही मराठवाडा कोरडा असल्याने त्यांनी भीषण दुष्काळाची चिंता व्यक्त केली. “हवामान खात्याच्या अंदाजानुसार 23 तारखेनंतर तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. भविष्यातील भीषण दुष्काळाच्या शक्यतेवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी आतापासूनच उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
बीड आश्रमशाळा प्रकरणावर कारवाईचे आदेश
बीडमधील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळेतील संस्थाचालकाने कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घरी राबवून घेतल्याच्या आणि त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणावर शिरसाट यांनी कडक भूमिका घेतली. “मी आजच आयुक्तांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे ते म्हणाले.
हेही वाचा…
‘निवडणुकीत आश्वासनांची खैरात, नंतर तिजोरी रिकामी!:मोफत साडी योजना बंद केल्यावरून वडेट्टीवार आणि रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात

राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 92 लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्य सरकारने गरीब आणि गरजू महिलांना मिळणारी ‘मोफत साडी वितरण योजना’ आर्थिक टंचाईचे कारण देत गुंडाळली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
‘जयंतराव पुरोगामी वारसा सोडणार नाहीत’:राष्ट्रवादीच्या एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर सतेज पाटलांचे वक्तव्य; म्हणाले- 2029 मध्ये बदल निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महायुतीत (NDA) सामील होणार असून, त्यांना राज्याचे अर्थमंत्रिपद दिले जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचल्या आहेत. या सर्व चर्चांना बळकटी मिळाली ती जयंत पाटील यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटीमुळे. या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
