Headlines

लाईट वाचवण्यासाठी फ्रिझचे तापमान काय असावे? भाज्या जास्त काळ ताज्या राहतील – fridge temperature settings for the rainy season simple tips to save electricity without compromising food freshness


पावसाळ्यात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी फ्रिजचे तापमान योग्य ठेवणे आणि ओलावा नियंत्रित करणे आवश्यक आहे.भाज्या साठवण्यापूर्वी त्या कोरड्या करून ठेवल्यास त्या जास्त काळ टिकतात.योग्य वापरामुळे अन्नाची गुणवत्ता टिकते आणि विजेचीही बचत होते.

Fridge Temperature Settings
फोटो सौजन्य :- iStock
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते, त्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी फ्रिजचा योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे ठरते. अनेक लोक फ्रिजचे तापमान खूप कमी ठेवतात, त्यामुळे वीजेचा वापर वाढतो; तर काही जण तापमान जास्त ठेवतात, त्यामुळे भाज्या, फळे आणि इतर खाद्यपदार्थ लवकर खराब होऊ शकतात. योग्य तापमानाची सेटिंग केल्यास अन्न ताजे राहते आणि विजेची बचतही होते.

पावसाळ्यात बाहेरचे तापमान तुलनेने कमी असले तरी हवेत ओलावा जास्त असतो. या ओलाव्यामुळे भाज्यांवर बुरशी येणे, पालेभाज्या खराब होणे आणि फळे लवकर मऊ होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे फ्रिजमध्ये योग्य थंडावा राखणे गरजेचे असते. मात्र फ्रिज खूप थंड ठेवल्याने प्रत्येक वेळी फायदा होतोच असे नाही. जास्त थंड तापमानामुळे काही भाज्यांवर थंडीचा परिणाम होऊन त्यांचा रंग, चव आणि पोत बदलू शकतो.

फ्रिजचा वापर करताना केवळ तापमान कमी करणे हा उपाय नसून, त्यामध्ये पदार्थ योग्य पद्धतीने ठेवणे, हवा खेळती राहू देणे आणि फ्रिजची नियमित स्वच्छता करणेही तितकेच आवश्यक आहे. योग्य पद्धतीने वापर केल्यास एकाच वेळी अन्नाची गुणवत्ता टिकवता येते आणि विजेचे बिलही कमी करता येते.पावसाळ्यात विशेषतः हिरव्या भाज्या, कोथिंबीर, पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या थेट ओल्या अवस्थेत फ्रिजमध्ये ठेवल्यास त्या लवकर खराब होतात. भाज्या साठवण्यापूर्वी त्यातील अतिरिक्त ओलावा काढणे आणि योग्य तापमानात ठेवणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य :- @iStock)

फ्रिजचे आदर्श तापमान किती असावे?

फ्रिजचे आदर्श तापमान किती असावे?

घरातील सामान्य फ्रिजसाठी फ्रिजच्या मुख्य भागाचे तापमान 3°C ते 5°C दरम्यान ठेवणे योग्य मानले जाते. पावसाळ्यात बाहेरील तापमान कमी-जास्त होत असले तरी हे तापमान अन्न ताजे ठेवण्यासाठी पुरेसे असते. फ्रीझरचे तापमान साधारण -18°C असावे. यामुळे गोठवलेले पदार्थ सुरक्षित राहतात आणि त्यांची गुणवत्ता टिकून राहते. अनेक वेळा लोक पावसाळ्यात फ्रिजचे तापमान खूप कमी करतात, जसे 1°C किंवा 0°C. मात्र यामुळे भाज्या आणि फळांमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांचा ताजेपणा कमी होऊ शकतो तसेच कॉम्प्रेसर जास्त वेळ चालल्यामुळे वीज वापर वाढतो.

पावसाळ्यात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी फ्रिज सेटिंग

पावसाळ्यात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी फ्रिज सेटिंग
  • पावसाळ्यात भाज्यांमध्ये ओलावा जास्त असतो. त्यामुळे त्या ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
  • भाज्या धुऊन लगेच फ्रिजमध्ये ठेवू नका
  • भाज्या धुतल्यानंतर त्यावर पाणी राहिल्यास त्या लवकर कुजतात.
  • भाज्या धुतल्या असल्यास पूर्णपणे कोरड्या करा.
  • शक्य असल्यास वापरण्याच्या आधीच भाज्या धुवा.
  • ओलसर भाज्या ठेवण्यासाठी पेपर टॉवेल किंवा स्वच्छ कापडाचा वापर करा.

फ्रिज तापमान किती असावे

फ्रिज तापमान किती असावे

पावसाळ्यात फ्रिजमध्ये ठेवलेल्या पदार्थांमध्ये ओलावा वाढू नये यासाठी हवाबंद डबे वापरा. यामुळे अन्नपदार्थांचा ताजेपणा टिकतो, वास मिसळत नाही आणि फ्रिज अधिक कार्यक्षमपणे काम करतो.

वीज वाचवण्यासाठी फ्रिज वापरण्याच्या सोप्या टिप्स

वीज वाचवण्यासाठी फ्रिज वापरण्याच्या सोप्या टिप्स

तापमान योग्य ठेवा
फ्रिजला सर्वात कमी तापमानावर ठेवणे म्हणजे जास्त वीज वापरणे. 3°C ते 5°C ही सेटिंग घरगुती वापरासाठी पुरेशी आहे.
फ्रिजचे दार वारंवार उघडू नका
प्रत्येक वेळी फ्रिजचे दार उघडल्यावर बाहेरील गरम हवा आत जाते. त्यामुळे पुन्हा थंड होण्यासाठी कॉम्प्रेसरला जास्त काम करावे लागते.काय हवे आहे ते आधी ठरवा आणि मगच फ्रिज उघडा.

दरवाजाची रबर सील तपासा

दरवाजाची रबर सील तपासा

फ्रिजच्या दाराभोवती असलेली रबर सील खराब झाली असल्यास थंड हवा बाहेर जाते. यामुळे वीजेचा वापर वाढतो.
फ्रिजच्या मागील बाजूची स्वच्छता करा
फ्रिजच्या मागील बाजूस असलेली कॉइल धुळीने भरल्यास उष्णता बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे फ्रिज जास्त वेळ चालतो.दर काही महिन्यांनी कॉइलची स्वच्छता केल्यास कार्यक्षमता वाढते.
फ्रिज भिंतीपासून थोडा दूर ठेवा
फ्रिजच्या मागील भागातून उष्णता बाहेर पडते. त्यामुळे भिंतीला अगदी चिकटून फ्रिज ठेवू नका. थोडी जागा ठेवल्यास हवा खेळती राहते आणि वीज बचत होते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा