Headlines

D S Kulkarni DSK seized Property announced absolute creates panic in depositors Crime News; डीएसकेंच्या जप्त मालमत्तांच्या लिलावाला विलंब, ठेवीदार अस्वस्थ; प्रॉपर्टी ‘ॲब्सोल्यूट’ घोषित म्हणजे नेमकं काय?


D S Kulkarni : मुंबई उच्च न्यायालयाने डी एस कुलकर्णींच्या जप्त मालमत्तांना ‘ॲब्सोल्यूट’ घोषित करून त्यानंतर त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते; परंतु प्रशासकीय पातळीवर लिलावाची प्रक्रिया पुढे सरकलेली नाही

DSK D S Kulkarni Pune Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ( डीएसके ) यांच्या समूहाच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया अद्यापही सुरू न झाल्याने हजारो ठेवीदारांमध्ये अस्वस्थता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जप्त मालमत्तांना ‘ॲब्सोल्यूट’ घोषित करून त्यानंतर त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते; परंतु प्रशासकीय पातळीवर लिलावाची प्रक्रिया पुढे सरकलेली नसल्याने हक्काचे पैसे मिळण्याच्या आशेवर असलेले ठेवीदार हवालदिल झाले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ‘रिट’ याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने पाच एप्रिल २०२४ रोजी जप्त मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेवर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्या वेळी सरकारने ५ मे २०१८ रोजी अधिसूचनेद्वारे जप्त केलेल्या मालमत्ता अद्याप ‘ॲब्सोल्यूट’ घोषित केल्या नव्हत्या; तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्याच्या न्यायालयात त्यासाठी आवश्यक अर्जही दाखल केला नसल्याची बाब याचिकाकर्त्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती.
Maharashtra TimesMumbai Local : CSMT फास्ट लोकलच्या लेडीज फर्स्ट क्लासमध्ये डाऊन मारण्यावरुन वाद, महिलेने सहप्रवाशांवर पेपर स्प्रे फवारल्याने गोंधळ

लिलावाबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय नाही

त्यावर, राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकिलांनी ग्वाही दिली की, सक्षम प्राधिकरण तीन आठवड्यांच्या आत विशेष ‘एमपीआयडी’ न्यायालयात मालमत्ता ‘ॲब्सोल्यूट’ घोषित करण्यासाठी अर्ज दाखल करेल. न्यायालयाने ही भूमिका नोंदवून घेतली होती. त्यानंतर संबंधित मालमत्ता ‘ॲब्सोल्यूट’ घोषित करण्याची तांत्रिक प्रक्रिया पुढे सरकली असली, तरी प्रत्यक्ष लिलावाबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मालकी हक्क असलेल्या मालमत्तांचा लिलाव प्राधान्याने करणे शक्य असतानाही, त्याला उशीर होत असल्याबद्दल ठेवीदार नाराजी व्यक्त करीत आहेत.

उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; देवेंद्र फडणवीस येणार? किशोरी पेडणेकरांनी डिवचलं

मालमत्ता ‘ॲब्सोल्यूट’ घोषित म्हणजे काय?

सरकारने तात्पुरती जप्त केलेली मालमत्ता न्यायालयाच्या अंतिम आदेशाने कायमस्वरूपी जप्त असल्याचे घोषित करणे म्हणजे ती ‘ॲब्सोल्यूट’ करणे होय. लिलाव सुरू करण्यासाठी ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते.
Maharashtra TimesCrime News : बाईक वळण घेताना मुद्दाम बॅग पाडली, 19 वर्षांच्या विवाहितेने प्रियकराच्या साथीने नवऱ्याचा काटा काढला, सीसीटीव्हीने भांडाफोड
लिलावाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी मुंबईतील विशेष ‘एमपीआयडी’ न्यायालयात पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर विशेष न्यायालयाने तातडीने आणि सकारात्मक निर्णय घेतल्यास प्रत्यक्षात लिलावाची प्रक्रिया सुरू होईल. त्यातून जमा होणारा निधी ठेवीदारांना वाटप करण्याचा मार्ग मोकळा होईल.
-अॅड. चंद्रकांत बीडकर, ठेवीदारांचे वकील

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा