Chhatrapati Sambhajinagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
संभाजीनगर पीएसआय हरीश खटावकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विकृत कृत्यामुळे संपूर्ण खाकी वर्दीला काळीमा फासली गेली आहे. शहरातील एका खासगी शाळेत शिकवणाऱ्या 48 वर्षीय विवाहित शिक्षिकेला धमकावून, हॉटेल आणि राहत्या घरात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी 53 वर्षीय पोलीस उपनिरीक्षक हरीश खटावकर याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत शिक्षिकेने विरोध केला असता तिला धावत्या कारमध्ये डांबून बेदम मारहाण करण्यात आली आणि तिचा मोबाईल हिसकावून तिला मध्यरात्री रस्त्यावर सोडून देण्यात आलं.
इच्छेविरुद्ध जबरदस्ती शारीरिक संबंध
पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी पीएसआय हरीश खटावकर आणि पीडित शिक्षिका यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत खटावकर याने मे 2015 मध्ये पीडितेला एका नामांकित हॉटेलमध्ये बोलावून घेतलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध पहिल्यांदा जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ऑक्टोबर 2016 मध्ये त्याने ‘घराच्या इंटिरिअर डिझाईनचं काम पाहायचं आहे’, असा बनाव रचून पीडितेला स्वतःच्या घरात बोलावलं आणि तिथेही तिच्यावर बलात्कार केला. ‘शारीरिक संबंध जर बाहेर कोणाला सांगितले, तर समाजात आणि कुटुंबात बदनामी करण्याची’, धमकी देऊन खटावकर पीडितेला सतत ब्लॅकमेल करत होता. Tukaram Mundhe : भिंतीवर बुरशी, डासांचा प्रादुर्भाव; प्रसिद्ध पारसी डेअरीवर FDA चे छापे, गंभीर त्रुटींमुळे परवाना निलंबित
संशयित आरोपी हरीश खटावकर हा सध्या पोलीस उपायुक्त (परिमंडळ 2) कार्यालयात वाचक म्हणून महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. 1993 मध्ये पोलीस दलात दाखल झालेल्या खटावकरचा पूर्वेतिहासही वादग्रस्त राहिला आहे. 11 वर्षांपूर्वी एका महिलेशी असभ्य आणि वाईट वर्तन केल्याप्रकरणी त्याला खात्यातून निलंबित करण्यात आलं होतं. या ताज्या गंभीर गुन्ह्यानंतर उपायुक्त कार्यालयाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना कठोर कारवाईसाठी अहवाल सादर केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन कुंभार या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा