Headlines

Amruta Sakpal Raorane on Career struggle and MPSC UPSC class;


Amruta Sakpal Raorane on Career struggle and MPSC UPSC class: मराठी टीव्ही इंडस्ट्रीतली अभिनेत्री अमृता रावराणे सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं करिअरमधील संघर्षावर भाष्य केलं.

Amruta Raorane
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: सिनेइंडस्ट्रीतल्या संघर्षाबद्दल अनेक कलाकार व्यक्त होत असतात. अनेकदा एकामागे एक मिळत जातं, पण प्रत्येत कलाकाराच्या आयुष्यात असाही काळ येतो जेव्हा त्याच्याकडे काम नसतं. एखादं प्रोजेक्ट संपलं की, दुसरं मिळेपर्यंतचा काळ हा कठीण असतो. आता मराठी टीव्ही इंडस्ट्रीतली अभिनेत्री अमृता रावराणे हिनं देखील करिअरमधली संघर्षावर भाष्य केलंय.

करिअरच्या सुरुवातीला नाटक,मालिकांमध्ये काम केलं. पण नंतर असाही काळ आला जेव्हा अमृताकडे काम नव्हतं. या मोकळ्या वेळात तिनं स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरू केला होता, मात्र नंतर एका मालिकेत निवड झाली अन् सगळंच बदललं, असं ती सांगते.

Maharashtra TimesIsha keskar: ‘जय मल्हार’ मालिकेसाठी ईशा केसरकरला मिळायचं पर डे इतकंच मानधन, स्वत:च केला खुलासा

काय म्हटलं अमृता रावराणे हिनं?
तर असाही एक काळ होता जेव्हा मी एक दीड महिना घरी होते. २०१२ची ही गोष्ट आहे. या एक दीड महिन्यात कोणतंच काम नव्हतं. ना नाटक ,ना मालिका. त्यामुळे या काळात काय करावं? असा प्रश्न पडला होता. त्यामुळे मी या काळात अभ्याकडे वळले. युपीएससी, एमपीएससीच्या परिक्षांचा अ्भ्यास सुरू केला. ठाण्यात एक क्लास होता. त्यांची एक पॉलिसी होती की, सुरुवातील १५ दिवस यायचं अभ्यासाला, आवडलं तरच पुढची फी भरायची. त्यामुळे मी पंधरा दिवस या क्लासला गेले होते. मलाही अभ्यासाठी आवड लागली होती. याच दरम्यान, रसिका नामजोशीचा फोन आला. त्यांनी विचारलं की, काय करतेस सध्या? त्यावर मी अभ्यास आणि क्लास लावल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांनी मालिकेच्या ऑडिशनबद्दल सांगितलं. मी त्या ऑडिशनले गेले आणि माझी निवडही झाली. ही माझं आयुष्य बदलणारी मालिका होती,असं अमृतानं सांगितलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

या मालिकेत काम करत असतानाच याच क्षेत्रात काम करायचं, असा निर्णय पक्का केला, असंही तिनं सांगितलं.माझे मन तुझे या मालिकेनं मला ओळख मिळवून दिली. यातील स्वामिनी भूमिका साकारायला मलाही आवडायचं, असंही ती म्हणाली.

Maharashtra TimesSukunya Kulkarni Mone: काही कलाकार मेकअप रूममध्ये भिंती, आरसे किंवा पडदे अस्वच्छ करून ठेवतात; नाट्यगृहांच्या दुरावस्थेवर स्पष्टच बोलल्या सुकन्या मोने

Ajinkya Raut Interview : मी गौतम बुद्धांच्या भूमिकेत, अभिनेता अजिंक्य राऊतला पडायचं स्वप्न

अमृताच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.’माझिया प्रियाला प्रीत कळेना‘ या लोकप्रिय मालिकेत तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसंच, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील तिच्या पात्रालाही प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. ऐश्वर्या नारकर आणि तितिक्षा तावडे यांच्याची या मालिकेत भूमिका होत्या. सध्या अमृता स्टार प्रवाहवरील ‘पाठराखीण’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.