Boats Capsized in Bay of Bengal: बंगालच्या उपसागरात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या दोन बोटी बुडाल्या आहेत. या दुर्घटनेत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नेपयिडॉ: बंगालच्या उपसागरात हृदयद्रावक घटना घडली आहे. म्यानमारच्या अल्पसंख्याक रोहिंग्या समुदायातील लोकांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बुडाल्या आहेत. या दुर्घटनेत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषद (UNHRC) आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना (IOM) यांनी दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या माहितीनुसार, बुडालेल्या दोन्ही बोटी जूनच्या अखेरच्या आठवड्यात म्यानमारच्या रखाईन प्रांतातून निघाल्या होत्या. या बोटींमध्ये रोहिंग्या शरणार्थींची संख्या सर्वाधिक होती. यातील काही जण सीमेपलीकडे असलेल्या बांग्लादेशच्या रेफ्युजी कॅम्पमधून आले होते. जवळपास २५० प्रवासी असलेल्या पहिल्या बोटीचा संपर्क प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच तुटला होता. तर २८० प्रवाशांना घेऊन जाणारी दुसरी बोट म्यानमारच्या अयेयारवाडी किनाऱ्याजवळ बुडाली. Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; 15 जणांचा करुण अंत, उंच उसळणाऱ्या लाटांमुळे घात? रोहिंग्या शरणार्थी सर्वसाधारणपणे मान्सूनच्या कालावधीत सागरी मार्गांचा वापर करत नाहीत. कारण खराब हवामान आणि उंच उसळणाऱ्या लाटांमुळे प्रवास अतिशय धोक्याचा होतो. UNHCR आणि IOM नं दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यामुळे आलेल्या पुरानं सागरी प्रवास आणखी जोखमीचा झाला. मृतांचा नेमका आकडा स्पष्ट होऊ शकलेला नाही. याबद्दलची अधिकृत माहिती समोर यायची आहे. पण ही मोठी दुर्घटना असू शकते, असं दोन्ही संस्थांनी म्हटलं आहे.
म्यानमारमध्ये सुरक्षा दलांकडून प्रचंड हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे १२ लाख रोहिंग्या मुस्लिमांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. म्यानमागरमध्ये हा समुदाय अल्पसंख्याक आहे. सध्याच्या घडीला हजारो रोहिंग्या शरणार्थी बांगलादेशात राहत आहेत. त्यांची सोय शरणार्थी शिबिरांमध्ये करण्यात आलेली आहे. Middle East Conflict: प्रवाशांनी भरलेल्या इराणच्या ‘महान’ विमानावर लँडिंगवेळी हल्ला; आसमंतात धुराचे लोट, तणाव वाढला अमेरिका आणि अन्य देशांकडून रोहिंग्यांना अर्थ सहाय्य केलं जातं. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये त्यात कपात झाली आहे. त्यामुळे बांगलादेशच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये अन्नाचा तुटवडा जाणवू लागला आहे. म्यानमारच्या रखाईन राज्यात लष्कर आणि बंडखोर गटात सुरू असलेल्या संघर्षामुळे परिस्थितीत आणखी बिघडली आहे. म्यानमारमध्ये लष्कराची सत्ता आहे. सध्याच्या घडीला म्यानमारमध्ये राहणाऱ्या रोहिंग्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे. त्यांचा मुक्काम शिबिरांमध्ये आहे. तिथे त्यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ६५०० हून अधिक रोहिंग्यांनी सागरी मार्गानं देश सोडण्याचा प्रयत्न केला होता.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा