Headlines

मध्यरात्री लोकलमध्ये जागेवरून वाद, तिघांचा तरुणावर हल्ला; पश्चिमनंतर मध्य रेल्वेवर धक्कादायक प्रकार| Maharashtra Times


Man Attacked in Local Train: गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेवर घडलेल्या प्रकारानंतर मध्य रेल्वेवरच्या अंबरनाथ लोकलमध्येही एका प्रवाशावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्री १२च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्थानाकजवळ ही घटना घडली.

मुंबई लोकल हल्ला
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: पश्चिम रेल्वेवर दरवाजा उघडण्याच्या वादातून एका २२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आल्याच्या प्रक्रारामुळे एकच खळबळ उडाली होती. आता यानंतर असाच एक प्रकार मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ही घडला आहे. सीएसएमटीवरून अंबरनाथला जाणाऱ्या लोकलमध्ये लोकलमधील जागेच्या वादातून तिघांनी एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं?

१६ जुलै मध्यरात्री १२.१० च्या सुमारास मध्य रेल्वेच्या अंबरनाथ लोकलमध्ये हा प्रकार घडला. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवश लोकलच्या जनरल डब्ब्यामध्ये दोन प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यानंतर त्या प्रवाशांमध्ये हाणामारी सुरू झाली. या वादादरम्यानच एका प्रवाशावर तिघांनी मिळून कोयत्याने हल्ला केला. यामुळे डब्यात एकच खळबळ उडाली. ट्रेन ठाकुर्ली स्थानकाच्या अगदी जवळ होती. स्थानकात प्रवेश करताच त्या तिघांनी तिथून पळ काढली.

जखमी प्रवाशावर उपचार सुरू

या हल्ल्यात लोकल प्रवासी गंभीर जखमी झाला होता. कल्याण रेल्वे पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि प्रवाशाला कल्याण येथील रुक्मीणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रवाशाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर अद्याप पसार असून रेल्वे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या हल्ल्यावेळी एका प्रवाशाने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रवाशांमध्ये जबर हाणामारी होताना दिसत आहेत. लोकलमध्ये प्रवाशांची गर्दीही दिसत आहे. पण आरोपीकडे शस्त्र असल्यामुळे कोणताही प्रवासी पुढे आला नाही.

पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेही असुरक्षित?

गेल्या अनेक दिवसांपासून लोकलमध्ये अनेक दुर्घटना घडत आहेत. एसी लोकलमधील एसी पडल्याने काही प्रवाशांना भोवळ आली. त्यापैकी एका प्रवाशाला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तसेचं, मध्य रेल्वेवर धावत्या लोकलमधून पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. लोकल मुंबईची लाईइलाईन असली तरी हीच प्रवाशांसाठी जीवघेणी बनत चालली आहे. गेल्या महिन्यातचं पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय मयंक लोहारवर आरोपी रोशन सुवर्णने चाकू हल्ला केला. यामध्ये मयंकचा मृत्यू झाली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा असा एक प्रकार घडला आहे. पण सुदैवाने प्रवाशाला वेळेवर उपचार मिळाले असून त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आलं.

लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. महिल्यांच्या डब्यामध्ये रात्री उशीरा रेल्वे पोलिस तैनात असतात. पण जनरल डब्यामध्ये सुरक्षेसाठी कोणीच उपस्थित नसतं. यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. एका प्रवाशाचा जीव गेल्यानंतरही प्रशासनाने काही कठोर पावलं उचलली नाहीत. लोकलमध्ये प्रवासी धारधार शस्त्र घेऊन मोकाट फिरत आहे. मुंबई लोकलच्या प्रवास सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा