Headlines

Mumbai Real Estate Metro Connectivity; मेट्रोनजीक ड्रिम हाऊस खरेदीचा ट्रेंड; जमिनीचे दर, पायाभूत सुविधांमुळे मुंबईकरांची पसंत बदलली


Real Estate Market: मुंबईत घर खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न असते पण, आजच्या काळात प्रत्येकालाच या मायानगरीत घर, फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदी करणं परवडत नाही. आपल्या देशातील मोठ-मोठ्या शहरांमधील मेट्रोचे निर्माण झालेले मोठे जाळे सध्या मालमत्तेच्या किमती निश्चित करण्यात सर्वात मोठ्या घटकांपैकी बनले आहे.

उदाहणार्थ समजा दोन अगदी सारखे अपार्टमेंट्स आहेत – ज्यांचे आकारमान, सुविधा आणि बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) एकसारखेच आहेत. पण एक ठिकाण मेट्रो स्टेशनपासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे तर, दुसरे ठिकाणावरून जवळच्या मेट्रो स्टेशनला जाण्यासाठी रिक्षाने 20 मिनिटे लागतात. मग तुम्हाला काय वाटत कुठं जास्त खर्च करावा लागेल?

Maharashtra TimesUS Tariff Threat: 500% शुल्क नको, पण 100% टॅरिफ तर द्यावाच लागेल! रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेची भारतावर कारवाई
10 वर्षांपूर्वी याचे उत्तर कदाचित त्या परिसराच्या टपाल पत्त्यावर अवलंबून असते तर, आता एकच उत्तर असेल ते म्हणजे की कामाच्या ठिकाणी पोहोचायला किती मिनिटे लागतात. मुंबई सारख्या महानगरात हा बदल गेल्या काही वर्षांपासून स्पष्ट दिसून येत आहेत.

मेट्रो कनेक्टिव्हीटी घर खरेदीचे फॅक्टर

मुंबईचा रिअल इस्टेट बाजार आता ‘कनेक्टिव्हिटी-अडजस्टेड व्हॅल्यू’कडे वाटचाल करत आहे. म्हणजे एकेकाळी केवळ दक्षिण मुंबई किंवा आसपासच्या भागात फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदीसाठी लोक अधिक किंमत मोजायचे. पण आता अनेकदा पहिला प्रश्न एकच प्रश्न विचारला जातो की येथून ऑफिस, विमानतळ किंवा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) गाठायला किती वेळ लागतो?

Maharashtra TimesGold and Silver Prices Fall: गगनाला भिडलेल्या सोन्या-चांदीच्या दरांना ब्रेक; गोल्डपाठोपाठ सिल्वर झळाळीही फिकी! आज किती स्वस्त झाला दर

मुंबईत बनतेय मेट्रोचे जाळे

महानगरात मेट्रो जाळे विस्तारत आहे ज्यामध्ये सुरू असलेल्या ‘लाइन 3’ आणि ‘लाइन 7’ यासारख्या नवीन मार्गिका जोडल्या जातील, जो या बदलाचा मुख्य घटक आहे. एकेकाळी शहराच्या परिघावरील भाग मानल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये या मेट्रो मार्गांमुळे पूर्णपणे नवीन निवासी आणि व्यावसायिक मायक्रो-मार्केट्स विकसित होत आहेत.

पायाभूत सुविधांसोबत इतर सुधारणाही जोडीला येत असल्यामुळे या मेट्रो मार्गांमुळे काही मार्गांवर गर्दीच्या वेळी (पीक-आवर) प्रवासाचा वेळ तब्बल 60 ते 70 मिनिटांनी कमी झाला आहे. मेट्रो मार्ग 3 आणि बीकेसीशी सुधारलेली कनेक्टिव्हिटी-व्यवस्थेच्या बळावर मध्य मुंबईत सुमारे 50 लाख चौरस फूट क्षेत्राचा नवीन ग्रेड-ए दर्जाचा कार्यालयीन प्रकल्प उभारला जाऊ शकतो.

Maharashtra TimesBab el-Mandeb: आधी इराणने अडवणूक केली, आता त्याचा मित्रही तेल कोंडी करणार! बाब एल-मंडेबचा गळा आवळणार येमेन

मेट्रो कनेक्टिव्हिटीचा किमतींवर परिणाम

लक्षात घ्या की केवळ घर खरेदीसाठी मेट्रोला पसंती मिळणारा मुंबई एकमेव शहर नाही. गुडगाव देखील याचं उत्तम उदाहरण आहे. काही दशकांपूर्वी गुडगाव एक शांत उपनगर होते पण, IT क्षेत्राची वाढ आणि दिल्ली-एनसीआरमधील प्रमुख ठिकाणांशी गुडगावला कनेक्ट करणाऱ्या मेट्रो सेवेचा विस्तार झाल्यानंतर आता हे शहर रिअल इस्टेटच्या प्रमुख केंद्रापैकी बनले आहे.

अशाप्रकारे, दळणवळण सुविधा सुधारतात तेव्हा मालमत्तेचे कितपत वाढू शकते याचे गुडगाव आणि मुंबई सध्या एक उत्तम उदाहरण आहे. तसेच मुंबई आणि गुडगावचे उदाहरण एका व्यापक तत्त्वाकडे लक्ष वेधते. यानुसार प्रवासाला लागणाऱ्या वेळेचा अंदाज घेणं कठीण नाही तर, मोजता येण्याजोगा मापदंड बनला असून खरेदीदार मोठ्या प्रमाणात विमानतळ किंवा ऑफिसपर्यंत पोहोचायला लागणाऱ्या प्रवासाच्या वेळेसारख्या ठोस आकड्यांच्या आधारावर परिसरांची तुलना करत आहेत.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत