एल निनोच्या घोषणेनंतर १५ जूनपासून पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. काही दिवसांपूर्वी धरणात पुरेसा साठा असल्याचं सांगत पाणीकपात मागे घेतली. मग सोमवारी पुन्हा पाणीकपात करण्याची घोषणा केली आणि आता २४ तासांच्या आत निर्णय बदलला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: महापालिका आयुक्तांनी बुधवारपासून पुन्हा पाणीकपात लागू करण्याची घोषणा करून २४ तास उलटण्यापूर्वीच ही पाणीकपात २२ जुलैपर्यंत लांबणीवर टाकल्याचे महापौर मंजूषा नागपुरे यांनी जाहीर केले. पाण्यासारख्या संवेदनशील विषयाबाबतही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचेच यातून पुढे आले आहे.
खडकवासला धरणसाखळीत एकूण पाणीसाठा चार अब्ज घनफुटांपेक्षाही (टीएमसी) कमी झाला होता. त्यामुळे तातडीने पाणीकपात लागू करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने १५ जूनपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सात ते १२ जुलैदरम्यान पाणीकपात रद्द करण्यात आली होती. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्याने धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा होईपर्यंत दिवसाआड पाणीकपात लागू करण्याचा निर्णय आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी घेतला. मात्र, मंगळवारी सायंकाळी महापौर नागपुरे यांनी तूर्त पाणीकपात रद्द करीत असल्याची घोषणा केली.
समन्वयाचा अभाव की राजकारण?
पालख्यांनी पुण्यातून प्रस्थान केल्यानंतर पुन्हा पाणीकपात लागू होणार होती. मात्र, याबाबतचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत होईल, असे महापौरांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात पक्षनेत्यांची बैठक होण्याआधीच महापालिका आयुक्तांनी पाणीकपातीचा निर्णय जाहीर केल्याने लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यातूनच आयुक्त नाही, तर पाणीकपातीचा निर्णय लोकप्रतिनिधी घेतात, हे दाखविण्यासाठी पाणीकपात रद्द केल्याची चर्च पालिका वर्तुळात आहे.
“२२ जुलैनंतर हवामान विभागाचा पावसाचा अंदाज, धरणांतील उपलब्ध पाणीसाठा, धरणातील पाण्याची आवक; तसेच एकूण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल. पुणेकरांनी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने करावा,” मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्यामुळे जुन्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची शुद्धीकरण क्षमता अपुरी पडत असल्याची कबुली पुणे महापालिकेने दिली आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळूनच वापरावे, असे तातडीचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मंगळवारच्या अंकात धायरी, खडकवासला आणि सिंहगड रस्ता परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या वृत्ताची दखल घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी सायंकाळी अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून पाण्याचा गढूळपणा वाढल्याची कबुली दिली; तसेच नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा