Thane TET Paper Leak Case : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. तसेच, फेरपरीक्षेची तारीख तातडीने जाहीर करण्याची आणि या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही त्यांनी केली.

बिजेंद्रकुमार गुप्ता याच्या पत्नीला पाटणा येथून अटक
या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून सुरू असून, आतापर्यंत १२ आरोपींना अटक झाली आहे. पेपरविक्रीसाठी आलेल्या तिघांना सुरुवातीला पोलिसांनी अटक केली होती; नंतर बिजेंद्रकुमार गुप्ता याच्या पत्नीला पाटणा येथून अटक झाली. अटकेतील आरोपींपैकी मिथुनकुमार सिंह हा गुप्ताचा साडू आहे. आग्रा येथील छापखान्यातून टीईटीचा पेपर फुटल्याची बाब तपासात उघड झाल्यानंतर, पोलिसांनी या छापखान्यात पॅकेजिंग विभागात काम करणारे नरेशकुमार मेहोर, बाबूलाल कुशवाह यांच्यासह माजी कर्मचारी संजयकुमार शर्मा यांना अटक केली. यानंतर, आणखी दोन आरोपींना अटक झाली. मात्र, या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार बिजेंद्रकुमार गुप्ता आणि आग्रा येथील सोनूकुमार किशनलाल अद्याप फरारी आहेत.
Pune News: धक्कादायक! मोशीतील दुर्घटनेप्रकरणी जखमींवरच गुन्हा दाखल; राजकीय नेत्याला वाचवण्यासाठी लाजीरवाणी भूमिका?
आग्रा येथील छापखान्यातून हा पेपर फुटला असून या छापखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. छापखान्यातील डीव्हीआर ताब्यात घेण्यात आला. छापखान्यातून पेपर फोडण्यामध्ये नरेशकुमार, बाबूलाल यांचा सक्रिय सहभाग असून, नंतर पेपर बिजेंद्रकुमार गुप्ता याच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. बाबूलालने पेपर दिल्यानंतर नरेशकुमारने तो बुटामध्ये लपवून छापखान्यातून बाहेर नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कामासाठी बिजेंद्रकुमारने आरोपींना काही प्रलोभने दाखवली होती.
थेट छापखान्यातील कर्मचाऱ्यांना आमिष
टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे परराज्यापर्यंत पसरल्याचे याआधीच उघड झाले आहे. मात्र, आरोपी थेट जिथे पेपर छापले जातात, त्या छापखान्यांतील कर्मचाऱ्यांना संपर्क साधत असत. त्यांना आमिष दाखवून किंवा ‘मॅनेज’ करत छापखान्यातून पेपर बाहेर काढणे आणि नंतर पेपरची विक्री करणे अशी आरोपींची कार्यपद्धती असल्याचे सहायक पोलिस आयुक्त विजय मराठे यांनी सांगितले. अशाच पद्धतीचे रॅकेट उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्लीमध्ये सक्रिय असल्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक, दोन मंत्रिपदांची चिन्हं, महाराष्ट्राबाबत महत्त्वाची चर्चा
हे भाजप सरकारचे अपयश : वर्षा गायकवाड
टीईटी पेपरफुटीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर, आता यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. ‘हा पेपर फुटलाच कसा, याचे उत्तर देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असताना, ते राजकीय पतंगबाजी करत आहेत. पेपर फुटलाच कसा, याचे आधी उत्तर द्या व अजून परीक्षा का घेतली नाही, यावर बोला,’ अशी टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी केली. पेपरफुटी हे भाजप सरकारचे अपयश असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

