Headlines

Nagpur Hingna Four Years Love Affair Family Opposes Marriage Couple Ends Life youth Dies Girl Condition Critical; चार वर्षांपासून एकमेकांवर खूप प्रेम, ऐनवेळी लग्नाला कुटुंबीयांचा विरोध, दोघांचं टोकाचं पाऊल, बॉयफ्रेंडने जग सोडलं; गर्लफ्रेंडसोबत काय घडलं?


Nagpur Crime News : दोघांनाही विवाह करायचा होता आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमोर ही इच्छा व्यक्त केली होती. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध केल्याचं सांगितलं जात आहे.

Nagpur Crime News
हिंगणा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आत्महत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरात प्रेमप्रकरणाचा दुर्दैवी शेवट झाला आहे. कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यानं व्यथित झालेल्या प्रेमी युगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत 21 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 20 वर्षीय तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

चार वर्षांच्या प्रेमाला विरोध

मृत तरुणाची ओळख विशाल विलास जवादे (वय 21) अशी झाली आहे. विशाल हा मंडप डेकोरेशनचे काम करत होता, तसेच ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. त्याचे त्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचं होतं आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांकडे याबाबतीत विचारणाही केली होती. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला स्पष्ट विरोध केला.
Maharashtra TimesCar Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात क्रेटा कारचा चुराडा; एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू!
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 12 जुलै रोजी लग्नाच्या विषयावर दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी 13 जुलै रोजी दुपारी दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. वानाडोंगरी ते संगम गाव मार्गावरील एका मैदानात जाऊन त्यांनी सोबत आणलेलं विषारी औषध प्यायले. विषाचं प्रमाण अधिक झाल्यानं विशालची प्रकृती घटनास्थळीच गंभीर झाली. या मार्गाने जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ दोघांनाही वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी दोघांवर उपचार सुरू केले. मात्र, रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणली

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून विषारी पदार्थ नेमका कोणता होता? तो कुठून आणला आणि या घटनेमागील सर्व परिस्थितीचा तपास पोलीस करत आहेत.
Maharashtra TimesNashik Accident News : मागून येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल, इकोला जोरदार धडक, दोन्ही ट्रकमध्ये कार दबली; चौघांचा जागीच करुण अंत
दरम्यान, विशालच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे काही ऑटोचालक मित्र मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले. त्यांनी संतापाच्या भरात तरुणीच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा