शरद पवारांची राष्ट्रवादी देखील आता भाजपसोबत जाणार अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकरणात जोर धरत आहेत. त्यातच आमदार जयंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री भेट घेतल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.