नथिंग कंपनीने नुकताच आपल्या ‘B’ सिरीजमधील नवीन ‘Nothing Phone 4b’ भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची पहिली सेल आजपासून प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर सुरू होत आहे. जर तुम्ही हा नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँक ऑफर्सच्या माध्यमातून थेट 2,625 रुपयांची घसघशीत सूट कशी मिळवायची, याची सविस्तर माहिती समोर आली आहे.

नथिंगच्या नवीन B सीरिजमधील Nothing Phone 4b नुकताच लाँच करण्यात आला होता आणि आज म्हणजेच 14 जुलैपासून या फोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. या फोनचे खास फीचर म्हणजे या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ग्लिफ बार मिळेल, ज्यामध्ये 45 मिनी एलईडी आहेत.
अँड्रॉइड 16 वर काम करणाऱ्या या हँडसेटमध्ये 3 वर्षांचे OS अपग्रेड आणि 6 वर्षांचे सुरक्षा अपडेट दिले जातील. हा फोन खरेदी करताना तुम्ही 2625 रुपयांच्या डिस्काउंटचा कसा फायदा घेऊ शकता, सेल सुरू होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देतो.
Nothing Phone 4b भारतात किंमत
या फोनच्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आणि 38,999 रुपये आहे. जर तुम्ही फोन खरेदी करताना एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय किंवा गुगल पे द्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 2625 रुपयांच्या डिस्काउंटचा फायदा मिळेल. या श्रेणीत हा फोन OPPO F33 Pro 5G, MOTOROLA Edge 70 Fusion, Realme GT 7T आणि Vivo V50 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
Nothing Phone 4b स्पेसिफिकेशन्स
- डिस्प्ले: फोनमध्ये 6.77 इंचाचा फुल एचडी प्लस रिझोल्यूशन असलेली सॅमसंग सुपर एमोलेड स्क्रीन मिळेल आणि 1000 हर्ट्ज इंस्टंट सॅम्पलिंग रेट मिळेल. हा फोन 2000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस आणि 120 हर्ट्ज पर्यंत रिफ्रेश रेटसह येतो.
- प्रोसेसर: हा फोन 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 चिपसेट आणि Adreno 810 GPU वापरतो. तसेच या डिव्हाइसमध्ये क्वालकॉम स्पेक्ट्रा इमेज सिग्नल प्रोसेसर, क्वालकॉम हेक्सागॉन एनपीयू आणि क्वालकॉम एआय इंजिन देखील जोडले गेले आहे. या उपकरणात थर्मल मॅनेजमेंटसाठी व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम देखील आहे.
- कॅमेरा सेटअप: मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप, 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर, इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबलायझेशन, ऑप्टिकल इमेज स्टॅबलायझेशन आणि ऑटोफोकस आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर देखील आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
- बॅटरी: 33 W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000 mAh ची बॅटरी उपलब्ध असेल, हा फोन 7.5 W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन 80 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होतो.
- कनेक्टिव्हिटी: नथिंगच्या या लेटेस्ट फोनमध्ये Wi-Fi 6, 5G, ब्लूटूथ व्हर्जन 6, 4G एलटीई, ग्लोनास, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि जीपीएस यासारखे शानदार फीचर्स मिळतात.

