Headlines

Hindus angry over sale of temple site to Muslims, fight in court over future of 40-year-old place of worship


  • Marathi News
  • International
  • Britain: Hindus Angry Over Sale Of Temple Site To Muslims, Fight In Court Over Future Of 40 year old Place Of Worship

दानिश खान | लंडन4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

लंडनपासून १२० किमी अंतरावर असलेल्या पीटरबरो येथे ४० वर्षे जुन्या मंदिराच्या आणि कम्युनिटी सेंटरच्या विक्रीवरून वाद वाढला आहे. पीटरबरो सिटी कौन्सिलने न्यू इंग्लंड कॉम्प्लेक्स लिलाव प्रक्रियेनंतर एका मुस्लिम संस्थेला, युनायटेड किंगडम इस्लामिक मिशन, विकण्याचा निर्णय घेतला आहे. याच संकुलात भारत हिंदू समाजाचे मंदिर आहे. हे शहर आणि आसपास राहणाऱ्या हजारो हिंदूंचे प्रमुख पूजा आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या निर्णयाने नाराज झालेल्या भारत हिंदू समाजाने हायकोर्टात याचिका दाखल करून विक्री प्रक्रियेला आव्हान दिले आहे.

कौन्सिलने मंदिराच्या सुमारे ४० वर्षे जुन्या धार्मिक आणि सामुदायिक भूमिकेकडे दुर्लक्ष केले, असा आरोप भारत हिंदू समाज संघटनेने केला आहे. बोलीच्या मूल्यांकनातही गंभीर त्रुटी होत्या. फेब्रुवारी २०२६ मध्ये हायकोर्टाने अंतरिम स्थगिती देत कौन्सिलला विक्री पूर्ण करण्यासारखे कोणतेही पाऊल उचलण्यापासून रोखले होते. आता न्यायिक पुनरावलोकनात याची तपासणी होत आहे की निर्णय घेण्याची प्रक्रिया कायद्यानुसार होती की नाही. मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले की त्यांचा विरोध मुस्लिम संस्थेला नाही, तर कौन्सिलच्या निर्णयाला आणि प्रक्रियेला आहे.

आरोप : लिलावात त्रुटी, आढाव्याशिवाय मंजुरी

विक्रीदरम्यान दोन्ही बाजूंच्या बोलींचे मूल्यांकन झाले नाही, असा आरोप भारत हिंदू समाजाने केला. संघटनेने कोर्टात सांगितले की कौन्सिलने तपासणी व स्कोअरिंगमध्ये चुका केल्या. यानंतर कॅबिनेट सदस्यांनी त्या शिफारशी पडताळणीशिवाय स्वीकारल्या. संघटनेनुसार, हे प्रकरण उच्च बोलीचे नाही, धार्मिक स्थळाचेही आहे.

तोट्यामुळे क्लब, स्पोर्ट‌्स सेंटर , संकुल विकावे लागते

निदर्शने, देणगीची मोहीम तीव्र : मंदिर समर्थकांनी निदर्शने सुरू केली आहेत. कायदेशीर लढाईचा खर्च उभा करण्यासाठी देणगी मोहीम सुरू आहे.

पीटरबरोचा वाद ब्रिटनमध्ये एकमेव नाही. येथील कौन्सिल वाढता खर्च व कमी सरकारी मदतीमुळे सामाजिक संकुल, स्पोर्ट‌्स सेंटर व कम्युनिटी इमारती विकून बजेट सांभाळत आहेत. २०२५ च्या ‘की सिटीज’ सर्वेक्षणात ६०% कौन्सिलनी मालमत्ता विक्री हा तोटा भरून काढण्याचा मार्ग सांगितला. बर्मिंगहॅमला २४-२५ चे बजेट संतुलित करण्यासाठी २,८८३ कोटीच्या मालमत्ता विकण्याचे लक्ष्य ठेवावे लागले. नॉटिंघमचा २०२५-२६ चा तोटा २६७ कोटी होता.

पीटरबरोचे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही, तर परिसरातील ४,००० हिंदूंचे एकमेव सामाजिक-सांस्कृतिक केंद्र आहे. जर हे संकुल बंद झाले, तर हिंदूंना पूजाअर्चा आणि सणांसाठी जवळच्या मंदिराकडे (केंब्रिज-५६ किमी) किंवा (लेस्टर-६४ किमी) जावे लागेल. येण्या-जाण्यातील तासनतास प्रवास वृद्ध आणि कुटुंबांसाठी व्यावहारिक आणि आर्थिक बोजा ठरेल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत