![]()
फिफा विश्वचषकात पक्षपाताच्या आरोपांमुळे जगभराततीव्र चर्चा सुरू आहे. अर्जेंटिनाच्या बाजूने फिफाचा कलआहे का, लिओनेल मेसीला विशेष सवलत दिली जातआहे का, मेसीची लोकप्रियता पंच आणिअधिकाऱ्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकते का, समानसंधीच्या तत्त्वाला बाधा होत आहे का, कमी चर्चितखेळाडू असलेल्या संघांवर अन्याय होत आहे का,स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर त्याचा परिणाम होत आहे काआणि या शंका दूर करण्यासाठी फिफाने पुरेशी पावलेउचलली आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित केलेजात आहेत. फिफा विश्वचषकासारख्या स्पर्धेत निष्पक्ष खेळ हीमूलभूत गरज आहे. पंचांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थितहोणे नवीन नाही. मात्र या स्पर्धेतही निर्णयांतील चुकाकमी नव्हत्या. व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) प्रणाली अजूनही वादाचा विषय ठरत असून निर्णयांतील सातत्याबाबत गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. भारताचे माजी फुटबॉलपटू बायचुंग भूतिया म्हणाले, इजिप्तविरुद्धच्या सामन्यात इराणचा रद्द केलेला गोल चुकीचा निर्णय होता. इराणला दिलेल्या वागणुकीमुळेहीवाद अधिकच वाढला. सामना संपल्यानंतर लगेच इराणच्या खेळाडूंनामेक्सिकोला पाठवले. पश्चिम आशियातील युद्धाच्यापार्श्वभूमीवर ही भू-राजकीय गरज असू शकते. मात्र,इराणचा मुद्दा हा अपवाद नव्हता. अर्जेंटिनाच्या सामन्यांतइजिप्त व स्वित्झर्लंडविरुद्ध झालेले काही निर्णयहीवादग्रस्त ठरले. कोणत्याही मोठ्या स्पर्धेची विश्वासार्हताटिकवण्यासाठी निर्णयांवर संशयाची छाया नसणेआवश्यक असते. याच बाबतीत हा विश्वचषक वादात सापडला आहे. ट्रम्पआणि फिफाचे अध्यक्ष यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरीलचर्चेनेही अनावश्यक वाद निर्माण केला. निर्णय प्रक्रियेतफिफा अध्यक्षांची भूमिका नसल्याचे फिफाने स्पष्ट केलेअसले, तरी या स्पष्टीकरणाने जनमानसातील शंका दूरझाल्या नाहीत. खेळाशी संबंधित विषयावर एखाद्या देशाच्या प्रमुखाने वफिफा अध्यक्षांनी चर्चा करण्याची गरजच का भासावी?त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांच्या शंका वाढत नाहीत का?खेळात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेपस्वीकारार्ह नाही आणि ही घटना संशय निर्माणकरण्यास पुरेशी होती. अशा प्रकारचा संशय एखाद्याजागतिक स्पर्धेच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने योग्य नाही.त्यामुळेच त्यावर उपाय योजना केली पाहिजे. स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून बरेचकाही पणाला लागले आहे. अंतिम काही सामन्यांसाठीफिफाने सर्वोत्तम पंचांची नियुक्ती करावी व प्रत्येकनिर्णय पूर्णपणे निष्पक्ष असल्याची खात्री करावी.आपल्या प्रतिष्ठेवर कोणताही डाग लागू न देणे ही त्याचीजबाबदारी आहे. या आरोपांना कटकारस्थानाचा भागम्हणून नाकारले जाऊ शकते. मात्र प्रत्येक वेळी तसेकरून चालणार नाही. या विषयावरील प्रश्न अधिक तीव्र होत असून, आताअधिक सतर्कतेची गरज आहे. माझ्यादृष्टीने निर्णयांतीलविसंगती ही सर्वात मोठी समस्या आहे. उदाहरणार्थ -इंग्लंड व हॅरी केनविरुद्ध मेक्सिकोच्या सामन्यात दिलेलीपेनल्टी व इजिप्तविरुद्ध अर्जेंटिनाच्या बाजूने दिलेलीपेनल्टी यांची तुलना केली तर निर्णयांतील स्पष्ट विसंगतीदिसून येते. दोन्ही प्रसंगी निर्णय कोणत्याही बाजूने जाऊशकला असता. मेक्सिकोच्या बाबतीत मात्र निर्णयअझ्टेका स्टेडियमवरील यजमान संघाच्या बाजूने गेला.मोठ्या खेळाडूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येत नाहीआणि त्यांच्याशिवाय खेळाची लोकप्रियताही कमी होऊशकते. या दोन्ही बाबींचा विचार व्हायला हवा. ही बाबयेथे लक्षात घेतली पाहिजे. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकांच्या मनातीलधारणा. चाहत्यांच्या नजरेत स्पर्धेची प्रतिमा पूर्णपणेनिष्पक्ष असली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या संशयालाजागा नसावी. 19 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वीफिफाने याची खात्री करणे आवश्यक आहे. फिफा हे साध्य करू शकेल का, याचे उत्तरच याविश्वचषकाचा वारसा ठरवेल. अखेरीस कोण जिंकतो आणि कोण हरतो, यापेक्षाखेळाचा विजय अधिक महत्त्वाचा असतो. आणिस्पर्धेतील प्रत्येक निर्णय, प्रत्येक स्तर संशयापलीकडेअसेल तेव्हाच हे शक्य होऊ शकेल.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) फिफाने उर्वरित निर्णायक सामन्यांसाठीसर्वोत्तम पंचांची नियुक्ती करावी.प्रत्येकनिर्णय संशया पलीकडचा असलापाहिजे. तिच गोष्ट आपल्या प्रतिष्ठेवरकोणताही डाग लागू देत नाही. खेळाच्याविश्वासार्हतेसाठी ते अत्यावश्यक आहे.
Source link
बोरिया मजुमदार यांचा कॉलम:संघांच्या विजय-पराभवापेक्षाही खेळाचा विजय जास्त महत्त्वाचा
