Headlines

Moshi Garbage Depot Accident: मोशी दुर्घटनेतील शेवटच्या कामगाराची बॉडी सापडली, कुटुंबाचा काळीज चिरणारा आक्रोश; 84 तासांनंतर बचावकार्य थांबवले!


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: मोशी येथील कचऱ्याचा डोंगर तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील शेवटचा मृतदेह काढण्यात बचाव पथकाला शनिवारी (११ जुलै) रात्री एक वाजता यश आले. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. दुर्घटना घडल्यापासून ८४ तास सुरू असलेले बचावकार्य शनिवारी रात्री थांबविण्यात आले.

वामन कसबे (वय ५०, रा. मोशी) असे या मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवस इमारतीच्या बाजूचा कचरा हटवून आणि इमारतीचा स्लॅब फोडून कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.

गुरुवारी दुपारपासून ते शनिवारी दुपारपर्यंत कचरा हटवण्याचे काम सुरू होते. त्यानंतर शनिवारी अक्षय सावंत, सुनील कोकरे, महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, रणजित पाटील, नागेश गायकवाड या कामगारांचे मृतदेह काढण्यात आले. मात्र, वामन कसबे यांचा मृतदेह सापडला नव्हता.

Maharashtra TimesSushma Andhare: मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा; सुषमा अंधारेंची मागणी
पर्यावरण विभाग, ठेकेदाराला नोटीस द्या
पिंपरी महापालिका आयुक्तांची वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (१२ जुलै) मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेचा पर्यावरण विभाग; तसेच अँटोनी लारा रिन्युएबल या ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra TimesRamdas Athawale: शरद पवार यांनी ‘एनडीए’त यावे! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य; सत्तेत समावेशाचे आमंत्रण
ही घटना पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत वेदनादायी आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रत्येक सहकाऱ्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, भारतीय सेनेचे जवान, पोलिस प्रशासन यांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले.-रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

ही घटना दुर्दैवी असून, मनाला प्रचंड वेदना देणारी आहे. यंत्रणांनी ८४ तास सलग बचाव मोहीम राबविली. नऊ नागरिकांना सुखरुप बाहेरदेखील काढले. -डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत