Headlines

Section 245 of Income Tax Act; ITR दाखल केला पण रिफंड अडकला, Section 245 ची नोटीस आली? घाबरू नका, ‘या’ सोप्या गोष्टीतून टाळता येईल नुकसान


ITR Filing 2026 : तुम्ही आयकर विवरणपत्र दाखल केले आहे आणि आता परताव्याच्या प्रतीक्षेत असताना तुम्हाला कलम 245 अंतर्गत नोटीस आली असेल तर सावध रहा. यामुळे तुमचा आयकर परतावा रोखला जाऊ शकतो किंवा कमी केला जाऊ शकतो.

काय आहे ही नोटीस?

तुम्हाला चालू निर्धारण वर्षासाठी परतावा मिळणे बाकी असल्याचे आयकर विभागाला आढळून येते, पण मागील आर्थिक वर्षाची कर थकबाकी देखील आहे, तेव्हा कलम 245 अंतर्गत नोटीस जारी केली जाते. म्हणजे तुम्ही मागील वर्षांमध्ये कर भरला नसेल किंवा एखादी मागणी प्रलंबित असेल, तर या वर्षी मिळालेला परतावा थेट त्यामध्ये समायोजित केला जाईल.

Maharashtra TimesGold ETFs Inflows: भारतीयांनी Gold Crash चा पुरेपूर घेतला फायदा; 3,443 कोटींची खरेदी केली; जागतिक प्रवासाच्या विरुद्ध गेम फिरवला
उधारणार्थ 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 12000 रुपयांचा परतावा मिळणे अपेक्षित असेल पण, 2022-23 या आर्थिक वर्षातील टॅक्स क्रेडिट्समधील तफावत किंवा कर चुकवल्यामुळे तुमचा 8000 कर थकीत आहे. अशा परिस्थितीत, आयकर विभाग कलम 245 अंतर्गत तुमच्या परताव्यामधून ही थकीत रक्कम वजा करण्याचा प्रस्ताव देतो. परिणामी, तुम्हाला 12000 रुपयांऐवजी केवळ 4000 रुपयांचा निव्वळ परतावा मिळेल.

Maharashtra TimesRBI Rate Hike: दरवाढीसाठी सज्ज व्हा! महागाईच्या सावटात गृहकर्जाचा EMI महागणार; RBI कडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता

तुमचा आयकर परतावा रोखला किंवा कापला का जातो?

आयकर विभागाकडून तुमचा परतावा रोखून धरण्याची किंवा कपात करण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • जुनी कर थकबाकी शिल्लक असणे
  • चुकीचे आयटीआर दाखल करणे किंवा त्यातील तफावत
  • टीडीएस/कर क्रेडिटमधील तफावत
  • असेसमेंटनंतर उद्भवणारी नवीन मागणी

अशा प्रकरणांमध्ये, आयकर विभाग प्रथम नोटीस पाठवतो आणि नंतर स्थापित कार्यपद्धतीनुसार परतावा समायोजित करतो.

Maharashtra TimesPF Interest Credit: 10 लाख, 50 लाख असो वा 1 कोटी, तुमच्या EPF खात्यात व्याजाचे किती रुपये येतील? जाणून घ्या संपूर्ण गणित
आयकर विभागाची नोटीस मिळाल्यावर काय करायचं?

कलम 245 च्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला महागात पडू शकते. करदात्यांना साधारणपणे 30 दिवसांच्या आत प्रतिसाद देणे आवश्यक असते. असे करण्यासाठी आयकर पोर्टलला भेट द्या आणि

  • Response to Outstanding Demand हा विभाग उघडा.
  • मागणी स्वीकारा किंवा नाकारा

तुम्हीच आयकर विभागाच्या डिमांडशी सहमत असाल, तर तुमच्या परताव्याची रक्कम त्यानुसार समायोजित केली जाईल. तुम्ही असहमत असाल तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह प्रतिसाद देणे बंधनकारक आहे.

आयकर परतावा शून्य कधी होतो?

बऱ्याच प्रकरणांमध्ये करदात्यांना पूर्ण परतावा मिळण्याची अपेक्षा असते, पण कलम 245 समायोजित केल्यानंतर खात्यात एक रुपयाही जमा होत नाही. देय कर जास्त असेल, तर पूर्ण परतावा कापला जाऊ शकतो, पण तुम्हाला उर्वरित रक्कम स्वतंत्रपणे भरावी लागू शकते.

कलम 245 अंतर्गत नोटीस मिळाली तर, भीती वाटणे साहजिक आहे पण एका ठरलेल्या प्रक्रियेचा भाग आहे. वेळेवर प्रतिसाद देऊन आणि तुमची कर नोंदी अद्ययावत ठेवून, तुम्ही तुमचा आयटीआर परतावा सुरक्षित करू शकता.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत