![]()
अक्कलकोट परिसराच्या विकासात व दुधनी बाजार समितीच्या निर्मितीत म्हेत्रे परिवाराचे मोठे योगदान आहे. ज्यांनी बाजार समिती उभी केली, त्यांचा आदर राखलाच पाहिजे, अशा शब्दात सुनावत शिवसेना आणि महायुती सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी दुधनी येथे लवकरच एमआयडीसी मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शनिवारी दिली. अक्कलाकेट येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार ज्योतीताई वाघमारे, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, जि.प. सदस्य शिवराज म्हेत्रे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, अमोल शिंदे, अमर पाटील, प्रवीण तानवडे, शीतल म्हेत्रे, भिमण्णा सोलापूरे, संगीता पाटील, आनंद तानवडे, बसवराज हौदे, रविना राठोड, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. ३५ जणांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्थानिक प्रशासन आणि राजकीय विरोधकांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. आम्ही सत्तेत आहोत की विरोधात, हेच समजेनासे झाले आहे. अधिकारी वर्गावर दबाव आणून हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. पालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरूनच हा चबुतरा पाडला, असा थेट आरोप म्हेत्रे यांनी केला. पराभवाचा राग मनात धरुन चबुतरा पाडला
Source link
तरुणांना रोजगारासाठी एमआयडीसी देऊ:बाजार समिती उभी केली त्यांचा आदर राखा, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला समाचार
