Headlines

Devendra Fadnavis: दिल्लीच्या चर्चेची उडवली खिल्ली! मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘मी कालच राजधानीत होतो’ – maharashtra cm devendra fadnavis reacts humorously to rumors about delhi role


Devendra Fadnavis: दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच भाष्य केले. नेमकं काय म्हणाले?

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनीधी, नागपूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारमध्ये सामील केले जाणार, ते दिल्लीला जाणार’ या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत विचारले असता, ‘मी परवाच दिल्लीला गेलो होतो’, असे मिश्किल उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना देत त्यांच्या दिल्लीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

शहरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी कर्जमाफी, विदर्भातील पावसाची परिस्थिती, बोगस सोयाबीन बियाणे आणि नागपुरातील ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरबाबत माहिती दिली. फडणवीस म्हणाले, ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात देशातील सर्वात मोठे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर उभारले जात आहे. यामुळे नागपूरला कन्व्हेन्शन हब म्हणून नवी ओळख मिळेल. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, प्रदर्शन आणि संवाद मेळावे येथे आयोजित केले जातील.’

Maharashtra TimesMaharashtra ATS Raid: पाकिस्तानी टोळीशी संपर्क; विदर्भातील 10 युवक एटीएसच्या ताब्यात, पाच जिल्ह्यांत मोठी कारवाई
कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, ‘यापूर्वीच्या कोणत्याही योजनेत न समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देण्यात आल्याने ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ठरेल’, असा दावा केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभार मानत त्यांनी एटीएसच्या मोठ्या कारवाईबाबत लवकरच सविस्तर माहिती देण्याचे सांगितले. बोगस सोयाबीन बियाण्यांच्या प्रकरणात ५ हजार नमुन्यांपैकी ३०० नमुने निकृष्ट आढळल्याने संबंधितांवर परवाना रद्द करण्यापासून फौजदारी कारवाईही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

२०३४पर्यंत फडणवीसच
देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन आहेत. २०३४पर्यंत तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत ही राज्याच्या १४ कोटी जनतेची इच्छा आहे’, असे मत महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. सध्या अफवांचा बाजार गरम आहे. अफवा बिनबुडाच्या आहेत असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis | विदर्भातील 10 युवक एटीएसच्या ताब्यात, मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची अपडेट

भाजपने राज्याची धुरा शिंदेंकडे द्यावी- बच्चू कडू
देवेंद्र फडणवीस हे केंद्रात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य शिवसेनेचे (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी २०२२मध्ये उठाव केला नसता तर आज भाजप सत्तेत नसता. त्यामुळे फडणवीस केंद्रात गेल्यास नैतिकतेच्या आधारावर भाजपने राज्याची धुरा शिंदेंकडे द्यावी, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा