Headlines

The Legendary OP nayyar: प्रतिभावंताचे ‘आरपार’ दर्शन – the legendary op nayyar- star romantic music maestro of the century


अनिरुद्ध भातखंडे

चित्रपटगीतांएवढेच त्यांच्या निर्मितीचे किस्से, त्यासंबंधी आठवणी ऐकणे हा कानसेनांच्या आनंदाचाच भाग. पूर्वीच्या काळी यासंबंधी नोंदी होण्याचे प्रमाण कमीच होते. चित्रपटसंगीत अभ्यासक विश्वास नेरुरकर यांनी अलीकडच्या काळात ही कसर भरून काढली आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार, शंकर-जयकिशन, मदनमोहन, खय्याम, सुधीर फडके, वसंत देसाई, नौशाद, राहुलदेव बर्मन, गुलजार आदी महान प्रतिभावंतांच्या कारकिर्दीचे दस्तावेजीकरण करण्याचे मौल्यवान कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी आणखी एका संगीतकार ाच्या कारकिर्दीतील नोंदी पुस्तकबद्ध केल्या आहेत. ते मनस्वी संगीतकार म्हणजे, ओंकारप्रसाद ऊर्फ ओ. पी. नय्यर! ओपींच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या औचित्याने ‘द लीजेंडरी ओ. पी. नय्यर- स्टार रोमँटिक म्युझिक मॅस्ट्रो ऑफ द सेंच्युरी’ पुस्तकाची दुसरी आवृत्ती त्यांनी सादर केली आहे.

आशा भोसले, गौतम राजाध्यक्ष, विश्वास नेरुरकर, प्रसाद महाडकर, राजू भारतन, रुना लैला, डॉ. मंदार बिचू, गीतकार अहमद वसी, श्रीकांत बोजेवार, सुहास किर्लोस्कर आदींचे २५ लेख आहेत. यातून या कलंदर कलावंताची प्रतिभा व आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व उलगडत जाते. ओपींचे मुख्य गायक म्हणजे आशा भोसले व महंमद रफी. कालांतराने ओपी-आशा यांच्यात कटुता निर्माण झाली, तरीही ओपींनी सुरुवातीच्या वर्षांत आशाताईंना कशाप्रकारे प्रोत्साहन दिले, याची हृद्य आठवण यात वाचण्यास मिळते. ‘१९६०च्या सुमारास ध्वनिमुद्रित केलेले एक गाणे माझ्या मनासारखे झाले नव्हते. ते गाणे मी फार वाईट गायले असे मला वाटत होते. त्यामुळे माझा स्वत:वरील विश्वास डळमळीत झाला. मी पूर्णपणे खचले.

नय्यरसाहेब मला पुन्हा कधीच गाण्यासाठी बोलावणार नाहीत, असे वाटले. मात्र त्या क्षणी मला त्यांनीच धीर दिला. अन्य कोणतीही गायिका तुझ्यासारखे गाऊ शकत नाही. तुझी कारकीर्द खूप मोठी असणार आहे हे मी तुला आत्ताच सांगतो… या त्यांच्या शब्दांमुळे मला उभारी मिळाली. त्यांच्या त्या पाठिंब्यामुळे माझा आत्मविश्वास परतला व गंमत म्हणजे, त्यानंतर मला केवळ अधिकाधिक गाणी मिळू लागली असे नव्हे तर माझ्या गायकीत सुधारणा झाली…’ आशा भोसले यांची ही आठवण ओपींच्या गुणग्राहकतेची साक्ष देणारी आहे.

प्रस्तुत पुस्तकात के. एल. पांडे यांनी एका स्वतंत्र प्रकरणात ओपींच्या रागआधारित गीतांची मोठी सूचीच दिली आहे. तर, ओपींनी आपल्या गाण्यांमध्ये ज्या विविध वाद्यांचा वापर केला त्याची सुरस जंत्री सुहास किर्लोस्कर यांच्या लेखात वाचण्यास मिळते. गीतकार या काहीशा उपेक्षित पैलूकडे श्रीकांत बोजेवार यांनी लक्ष वेधले आहे. ओपी व त्यांचे गीतकार यावर आधारित हा लेख वाचनीय आहे. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात ओपी यांनी ज्यांच्याशी घरोबा केला होता त्या राणी नाखवा यांच्या लेखातून ओपींच्या स्वभाववैशिष्ट्यांचे दर्शन घडते. अतिशय शिस्तप्रिय, स्वच्छताप्रिय, वक्तशीर असे त्यांचे वर्णन करताना त्यांनी अनेक रंजक अनुभव शब्दबद्ध केले आहेत. ‘माझ्या शीघ्रकोपी स्वभावामुळे मी आयुष्यात खूप काही गमावले आहे,’ अशी कबुलीही ओपींनी त्यांच्याजवळ दिली होती, याचा उल्लेख येतो.

लेखांव्यतिरिक्त ओपींच्या चित्रपटांची, गीतांची सूचीही यात वाचण्यास मिळते. ओपींनी ८१ चित्रपटांना संगीत दिले. त्यातील सात चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. या सर्व चित्रपटांत मिळून त्यांच्या गाण्यांची संख्या उणीपुरी ६६० आहे आणि आशा भोसले यांनी त्यातील ३२३ गाणी गायली आहेत! रफींनी गायलेल्या गाण्यांची संख्या २०३ आहे. हिंदी चित्रपटसंगीताच्या त्या सुवर्णकाळात संगीतकारांमध्ये तीव्र स्पर्धाही होतीच. १९५६, १९५७ व १९५८ या वर्षांत त्यांनी संगीत दिलेले अनुक्रमे आठ, आठ, व १० चित्रपट प्रदर्शित झाले. यानंतर दर वर्षी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट त्यांना मिळाले. पुढे १९६६मध्ये त्यांचे सात चित्रपट झळकले. एवढे माफक काम करूनही आघाडीच्या संगीतकारांत गणना होणे हाच त्यांचा मोठेपणा. ओपींची हीच थोरवी प्रस्तुत पुस्तकामागील प्रेरणा आहे.
————————————-
द लीजेंडरी ओ. पी. नय्यर
– स्टार रोमँटिक म्युझिक मॅस्ट्रो ऑफ द सेंच्युरी
संपादन : विश्वास नेरूरकर
प्रकाशक : गायत्री पब्लिकेशन्स आणि जीवनगाणी
पाने : ३०३, किंमत : २००० रुपये

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत