Headlines

Kaynat Dhar : पवारांच्या घरात पुन्हा सनई चौघडे वाजणार, कोण आहे पार्थ पवारांची होणारी पत्नी? – parth pawar engagement on 29 july who is kaynat dhar


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाहसोहळा नुकताच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला. रेवती सुळे यांचा विवाह भाजप आमदार आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्यासोबत झाला. या विवाहसोहळ्याला देशातील राजकीय, सामाजिक, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या हाय-प्रोफाइल लग्नाचे सर्व स्टार-स्टडेड फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल झाले. मात्र, या संपूर्ण सोहळ्यात एका व्यक्तीच्या एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आणि सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली— ती व्यक्ती म्हणजे कायनात धार. कायनात धार यांनी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासोबत या विवाहसोहळ्यात एकत्र एन्ट्री केली. तेव्हापासूनच पवारांच्या घरात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार का, पार्थ पवारांचा साखरपुडा कधी आणि कायनात धार नेमक्या कोण आहेत, याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली होती. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि कायनात धार यांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासोबत अगदी घरच्या सदस्याप्रमाणे कायनात धार यांनी लग्नसोहळ्यात प्रवेश केला. लग्नात उपस्थित असलेल्या अनेकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. एका कौटुंबिक आणि अत्यंत खाजगी मानल्या जाणाऱ्या या विवाहसोहळ्यात त्यांची अशी थेट आणि जवळची उपस्थिती पाहून, त्या पवार कुटुंबाच्या लवकरच सूनबाई होणार का, अशा चर्चांना उधाण आलं होतं आणि आता ते खरं ठरताना दिसतंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत