Headlines

nanded crime coaching class director nt jadhav found dead in himayatnagar; पहाटे क्लासच्या आवारात दिसलं भयानक दृश्य, नांदेडमधील जाधव सरांसोबत नेमकं काय घडलं?


Nanded Crime News : शांत आणि संयमी शिक्षक म्हणून ओळख असलेल्या एन. टी. जाधव यांच्या मृत्यूने नांदेड हादरलं आहे. घटनेमागे नेमकं काय कारण आहे, याचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून अनेक चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

nanded coaching class director nt jadhav found dead
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड: जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पहाटे क्लासेसच्या परिसरातील चिंचेच्या झाडाला संचालकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. एन. टी. जाधव अस मृतकाचे नाव आहे. जाधव हे शांत व संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेने हिमायतनगर व शहरात मात्र हळहळ व्यक्त होत आहे.

एन टी जाधव हे शिक्षक असून हिमायत शहरात खाजगी शिकवणी केंद्र चालवतात. अनेक वर्षांपासून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. शांत आणि संयमी अशी त्यांची ओळख आहे. अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा तसेच शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविले होते. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना ट्युशन परिसरातील चिंचेच्या झाडाला जाधव यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर नागरिकांनी याची माहिती तात्काळ हिमायतनगर पोलीसांना दिली.

Maharashtra TimesTukaram Mundhe FDA Action : 72 तास, 5 शहरं आणि 90.42 लाखांचा साठा; मुंढेंच्या FDAनं आरोग्याशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश केला, नेमकं काय-काय जप्त?

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक, माजी विद्यार्थी, पालक आणि परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, या आत्महत्ये मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी भूखंड व्यवहाराशी संबंधित वाद असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या शाळेची मान्यता रद्द झाल्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र या सर्व बाबींना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime : तरुणीच्या लग्नाला अवघे काही दिवस, नवऱ्याला अचानक एक फोन, पुढे समोर आलं धक्कादायक प्रकरण

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येचे खरे कारण शोधण्यासाठी सर्व शक्य त्या अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येनंतर विविध चर्चाना उधान आल आहे हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा